केदारनाथ मार्गावर दरड कोसळली;  4000 भाविक अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळली. या नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे 4 हजार भाविक अडकले आहेत. दरम्यान, खराब हवामान तसेच डोंगरावरून कोसळणाऱ्या सतत दरडींमुळे  केदारनाथ यात्रा आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आली असून हेलिकॉप्टर सेवाही स्थगित करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील लखनौ, कानपूर, उन्नाव, बाराबांकी, अयोध्या आणि जौनपूरसह 45 शहरांमध्ये गेल्या 65 तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहत आहेत. 22 जिह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर उत्तराखंडमधील सर्व जिह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरातील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.