Asian Games – आशियाई राऊंडअप; बॉक्सिंगमध्ये तीन पदके पक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉक्सिंगच्या रिंगमध्ये हिंदुस्थानच्या अंकुश पंघाल, परवीन आणि नरेंद्र बेरवाल यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत आशियाई स्पर्धा गाजवली. त्यामुळे हिंदुस्थानची आणखी तीन पदके निश्चित झाली आहेत. राष्ट्रपुल स्पर्धेचा विजेता अंपुश पंघालने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात ताजिकिस्तानच्या नेक्रूज सलीमोव्हचा 5-0 असा धुव्वा उडवला. महिलांच्या 65 किलो गटात परवीनने उझबेकिस्तानच्या नवबाखोर खामिदोवाचा 5-0 असा पराभव केला. पुरुषांच्या गटात नरेंद्र बेरवालने थायलंडच्या अदथापोंग सेंगटेपवर दमदार विजय मिळवत उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले. तीनही हिंदुस्थानी मुष्टियोद्धय़ांनी उपांत्य फेरी गाठल्याने बॉक्सिंगच्या रिंगमध्ये हिंदुस्थानच्या पदकांची आणखी भर  पडणार हे निश्चित झाले आहे.

दोन सेंटीमीटरने सोने हुकले

महिला लांब उडीमध्ये अन्सी सोजन सुवर्णपदकाच्या अगदी उंबरठय़ावर होती. तिची 6.53 मीटरची उडी बराच वेळ आघाडीवर होती. मात्र चीनच्या हुआंग यिंगयिंगने शेवटच्या प्रयत्नात 6.55 मीटरची उडी मारत अवघ्या दोन सेंटीमीटरने अन्सीला मागे टाकले. अन्सीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सर्वेशची उडीही सोन्याचीच

उंच उडीत सर्वेश कुशारे आणि चायनीज तैपेईचा चाओ ह्सुआन-फू दोघांनीही 2.25 मीटर उंची गाठली. पण सर्वेशने ही उंची पहिल्याच प्रयत्नात पार केली नव्हती. चाओने मात्र पहिल्याच प्रयत्नात ती पार केली. त्यामुळे ‘काऊंटबॅक’मध्ये सर्वेश मागे पडला आणि त्याला रौप्यपदक मिळाले. त्याने हिंदुस्थानला उंच उडीत 56 वर्षांनंतर पदक जिंपून दिले. शेवटचे पदक 1970 मध्ये मिळाले होते.

शैलीचे पदक शेवटच्या उडीने हिरावले!

महिला लांब उडीमध्ये शैली सिंह 6.42 मीटरच्या प्रयत्नासह पदकाच्या शर्यतीत होती. मात्र चीनच्या मेंगयी टॅनने शेवटच्या प्रयत्नात 6.46 मीटरची उडी मारली आणि शैलीला चौथ्या स्थानावर ढकलले. म्हणजे पदक तिच्या हातात दिसत असतानाच शेवटच्या प्रयत्नाने चित्र पालटले.

ती आली आणि थेट पदक घेऊन गेली

हरिता भद्राचा सहभागच अखेरच्या क्षणी निश्चित झाला होता. पण महिला 200 मीटरमध्ये तिने या संधीचे पदकात रूपांतर केले. 23.20 सेपंदांच्या वेळेसह तिने कांस्यपदक जिंकले. म्हणजे स्पर्धेत येण्याची खात्री शेवटच्या क्षणी आणि पदक मात्र लगेच!

दोन सेंटीमीटरचा हार्टब्रेक

सुवर्णपदक अवघ्या दोन सेंटीमीटरने हुकल्यानंतर अन्सी सोजननेही या फरकाची कबुली दिली. शेवटच्या क्षणापर्यंत ती सुवर्णपदकाच्या स्थितीत होती. अंतिम प्रयत्नात चीनच्या खेळाडूने 6.55 मीटर उडी मारली आणि तिचे सोने रौप्यात बदलले.

 सिंधूचे 24 तासांत तीन सामने

पी. व्ही. सिंधूला या दिवशी चीनच्या चेन यू फेईविरुद्ध सामना खेळताना अत्यंत कमी विश्रांती मिळाली. ती 24 तासांच्या आत तिसरा सामना खेळत होती. प्रदीर्घ रॅली आणि थकव्याचा परिणाम तिच्या खेळावर झाल्याचे तिने सामन्यानंतर सांगितले.

ईशाने मनूला मागे टाकले

25 मीटर पिस्तूलच्या अचूकता फेरीत ईशा सिंहने 290 गुण मिळवत हिंदुस्थानी खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आणि सहावे स्थान मिळवले. मनू भाकर व राही सरनोबत यांना प्रत्येकी 287 गुण मिळाले. त्यामुळे ‘मोठे नाव’ असलेल्या मनूपेक्षा ईशा गुणतालिकेत पुढे राहिली.

हरजिंदरचे प्रयत्न फसले

69 किलो वजनी गटात हरजिंदर काwरने स्नॅचमध्ये 94 किलो उचलले, पण 97 किलोचे पुढील दोन्ही प्रयत्न अपयशी ठरले. अखेरीस क्लीन अॅण्ड जर्पमध्ये 110 किलोसह एपूण 204 किलो वजन उचलून ती नवव्या स्थानावर राहिली.

नरेंदरचा दोन मिनिटांत खेळ खल्लास

90 किलोवरील बॉक्सिंगमध्ये नरेंदर बेरवालने थायलंडच्या अॅथापोंग सेंगटेपविरुद्ध अक्षरशः वादळ निर्माण केले. जोरदार प्रहारांनंतर पंचांनी थाई बॉक्सरला तीन वेळा ‘स्टँडिंग काऊंट’ दिला आणि दोन मिनिटे पूर्ण होण्यापूर्वीच सामना थांबवला. नरेंदरने थेट उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले.

तिरंदाजांची कमाल

हिंदुस्थानच्या पुरुष-महिला रिकर्व्ह, पुरुष-महिला पंपाऊंड तसेच मिश्र रिकर्व्ह आणि मिश्र पंपाऊंड अशा सर्व सहा सांघिक प्रकारांत तिरंदाजांनी उपांत्य फेरी गाठली. पुरुष रिकर्व्ह संघाने चीनला 5-1, तर महिला संघाने चायनीज तैपेईला 6-0 हरवले. मिश्र रिकर्व्हने व्हिएतनामवर 6-0 विजय मिळवला.

सर्फिंगमध्ये लाटांवर हिंदुस्थानी चौकडी

सार्ंफगमध्ये साखर शांती गायेन, कमाली प्रकाश आणि सिवाराज बाबू यांनी आपल्या-आपल्या शॉर्टबोर्ड लढतीत पुढची फेरी गाठली. सिवाराजने इराणच्या दावूद खादीरला 8.96-च्या गुणांसह मागे टाकले, तर कमालीने सिंगापूरच्या प्रतिस्पर्धीला 7.57-4.50 असे हरवले. लाटांवरही हिंदुस्थानचा झेंडा पुढे राहिला.

नागोया नगारा सिवासंगरीचे अपघातातून सोनेरी पुनरागमन

मलेशियाच्या सिवासंगरी सुब्रमणियमने महिलांच्या स्क्वॉशमध्ये सलग दुसरे आशियाई सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी झालेल्या भीषण कार अपघातानंतर तिच्या मानेच्या आणि मणक्याच्या दुखापतीमुळे ती पुन्हा चालू शकेल का, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यातून जबरदस्त पुनरागमन करत तिने नागोयात जेतेपद कायम राखले. या विजयासह तिने 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे थेट तिकीटही मिळवले.

ईन योची सुवर्ण हॅटट्रिक

मलेशियाचा एनजी ईन यो याने पुरुषांच्या स्क्वॉशमध्ये सलग तिसऱ्यांदा आशियाई सुवर्णपदकावर नाव कोरले. नागोयातील विजयासह तो 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा स्क्वॉशमधील पहिला खेळाडू ठरला. विशेष म्हणजे त्याचा चारही सामन्यांमध्ये एकही पराभव झालेला नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेपासून थेट ऑलिम्पिकच्या तिकिटापर्यंत त्याचा प्रवास सुरू झाला आहे.

फायनलमध्ये सहकारीच प्रतिस्पर्धी

स्क्वॉश मिश्र दुहेरीत हाँगकाँगच्या दोन जोडय़ा अंतिम फेरीत आमने सामने आल्या. ली का-यी आणि टँग मिंग-हाँग यांनी आपल्या सहकार्यांचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले, तर टोबी त्से यी-लाम आणि लाई चुक-नाम यांना रौप्यपदक मिळाले. म्हणजे अंतिम सामन्यानंतर हाँगकाँगच्या तंबूत आनंदही आणि थोडी निराशाही-दोन्ही एकाच वेळी पाहायला मिळाली.

पाचव्यांदा दक्षिण कोरियाला सुवर्ण

दक्षिण कोरियाने जपानचा 3-1 असा पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेतील बेसबॉलचे सलग पाचवे सुवर्णपदक जिंकले. सामना 1-1 असा बरोबरीत असताना आठव्या डावात किम दो-याँगने निर्णायक धाव घेतली आणि त्यानंतर मून बो-ग्याँगने आणखी एक धाव करून आघाडी वाढवली. पावसात रंगलेल्या अंतिम सामन्यात कोरियाने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला.

..तरी सोने जिंकले!

दक्षिण कोरियाच्या महिला तलवारबाजी संघाने सेबर सांघिक प्रकारात जपानचा 45-31 असा पराभव केला. विशेष गंमत म्हणजे या चारही कोरियन खेळाडूंना स्पर्धेपूर्वी वैयक्तिक प्रकारात पदक मिळाले नव्हते. मात्र संघ म्हणून एकत्र आल्यावर त्यांनी थेट सुवर्णपदक जिंकले. कोरियाचे या आशियाई स्पर्धेतील तलवारबाजीतील हे चौथे सुवर्ण ठरले.

घोडय़ावर बसून कोरियाचा 12 वर्षांचा इंतजार संपवला!

दक्षिण कोरियाच्या नाम डोंग-हॉनने अश्वारोहणाच्या वैयक्तिक ड्रेसेजमध्ये सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात कोरियाला तब्बल 12 वर्षांनी सुवर्णपदक मिळाले. नामने 75.190 गुण मिळवत चीनच्या यू जियायीला केवळ 0.140 गुणांनी मागे टाकले. त्याने यापूर्वी सांघिक ड्रेसेजमध्ये रौप्यपदकही मिळवले होते.

14 वर्षांची ‘एसटी’  पोडियमपासून थोडक्यात दूर

थायलंडची अवघी 14 वर्षांची वारियाराया सुकासेम, म्हणजेच ‘एसटी’ महिलांच्या स्ट्रीट स्केटबार्ंडगमध्ये सातव्या क्रमांकावर राहिली. तिने 102.85 गुण मिळवले. अंतिम फेरीत तिने काही चुका झाल्याचे मान्य केले, मात्र हा अनुभव पुढील स्पर्धांसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. एवढय़ा कमी वयात आशियाई अंतिम फेरी गाठणे हीच तिच्यासाठी मोठी झेप ठरली.