शाळेची पाहणी करायला गेलेल्या रांका यांना पोलिसांनी उचलले, आसाम सरकारकडून मुस्कटदाबी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) सहसंयोजक आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आज गुवाहाटी पोलिसांनी ताब्यात घेतले. एसआयआरनंतर मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या कुटुंबीयांची भेट तसेच सरकारी शाळांचा आढावा घेण्यासाठी आशुतोष रांका हे आसाममध्ये दाखल झाले होते. यासंदर्भात स्वयंसेवकांची बैठक होणार होती. त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांना सायंकाळी सोडण्यात आले.

दिसपूर परिसरात सचिवालयावळच्या चौधरी टीला येथून आशुतोष यांना ताब्यात घेण्यात आले. सरकार शाळा, काझीरंगा आणि पुराशी संबंधित मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यापासून रोखू इच्छिते, बेकायदा ताब्यात घेतले होते, असा आरोप रांका यांनी केला.