
परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे शिवराज प्रतिष्ठान (परळ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेत परळ येथील यश धुमाळ यांना प्रथम क्रमांक विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
आमदार विठ्ठल चव्हाण यांच्या स्मरणार्थ सुभाष डामरे मित्र मंडळाने संस्थापक आनंद गांवकर, संचालक तथा शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार महेश सावंत, शिवसेना उपनेते संजय सावंत, नगरसेविका उर्मिला पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत द्वितीय क्रमांक-राहुल बिटला (परळ), तृतीय क्रमांक (विभागून)- गणेश गुरव (नायगांव) आणि क्रिशा टंकर (परळ) यांनी पटकावला. तसेच उत्तेजनार्थ म्हणून सारंग राणे (परळ), विजय अजगांवकर, आदित्य चव्हाण (वडाळा), सोहम कुणकवळेकर (परळ), कविता पाटील (डिलाईल रोड), मानसी पाके (चिंचबंदर), शिल्पा साळसकर (परळ), रिता मुळीक (लालबाग), आशा भोजने (परळ), कुणाल सब्बन (परळ) यांची नावे जाहीर करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण अमर जाधव आणि संजय तोडणकर यांनी केले, तर स्पर्धेचे आयोजन उर्मिला पांचाळ, उपविभागप्रमुख पराग चव्हाण, नाना फाटक, अध्यक्ष संतोष कांबळी, रुपेश कोचरेकर, अमेय भालेकर, प्रणव डामरे, अभिषेक गवाणकर, नीलम मिरगळ यांनी केले.






















































