पालिका कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपये बोनस द्या, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-legal-department-in-turmoil-harassment-of-staff-excess-workload-and-lack-of-coordination-raises-serious-questions

महापालिकेतील कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना 2025-26 या आर्थिक वर्षात 40 हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे. तसेच या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या बोनससंदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने अध्यक्ष बाबा कदम यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले आहे. महापालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी व आरोग्य खात्यातील आरोग्य सेविका, बहुउद्देशीय कामगार, आरसीएच-2, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचारी, एनयूएचएम/डीएस एन्टरप्रायझेसमधील कामगार, कर्मचारी, प्लाझ्मा सेंटर, कंत्राटी कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे कामगारांच्या बोनसच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पत्राद्वारे केली आहे.