‘फेस्टिव्हल ऑफ अल्टरनेटिव्हज’ला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
panvel-yusuf-meherally-centre-festival-of-alternatives-nasiruddin-shah-abhijit-deepke-gandhi-jayanti-report

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पनवेलच्या तारा येथील युसुफ मेहरअली सेंटरमध्ये झालेल्या तीन दिवसीय ‘फेस्टिव्हल ऑफ अल्टरनेटिव्हज’ला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

गांधीवादी नेते डॉ. जी. जी. पारीख यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ‘फेस्टिव्हल ऑफ अल्टरनेटिव्हज’चे आयोजन करण्यात आले होते.तळागाळातील नावीन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत ग्रामीण विकास व सामाजिक न्याय या क्षेत्रांतील 60 हून अधिक वर्षांच्या वाटचालीचा यावेळी आढावा घेण्यात आला. जेन झी आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेले अभिजीत दीपके आणि ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यातील संवाद हे फेस्टिव्हलचे वैशिष्टय़ होते. कार्यक्रमाला महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, विद्याताई, अॅड. सुरेखा दळवी हेही उपस्थित होते.

देशाला पुन्हा आवाज मिळालाय

खूप वर्षांनंतर देशात काहीतरी महत्त्वाचे घडत आहे. देशाचा हरवलेला आवाज पुन्हा मिळाला आहे, असे मत दीपके यांनी मांडले.

दीपके यांनी घेतली मेधा पाटकर यांची भेट

नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. अभिजीत दीपके यांच्या हे लक्षात येताच ते व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यांना जाऊन भेटले. त्यांनी मेधा पाटकर यांना वाकून नमस्कार केला. अवघ्या चार वर्षांचे असताना मेधा पाटकर यांच्याशी झालेल्या भेटीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.