
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे वाहकाचे वेगावरील नियंत्रण सुटले आणि हा ब्रेक फेल ट्रक थेट समोरील ट्रकवर धडकला. यामध्ये दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
खोपोली बायपासजवळ ब्रेक
फेल झाल्याने ट्रकने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ब्रेक फेल झालेल्या ट्रकमधील चालक आणि क्लीनर हे दोघेही केबिनमध्ये अडकले. बोरघाट पोलीस व सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना बाहेर काढून खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले.
क्रेनचे सहाय्य
एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखाल करण्यात आले. अमृत इंगलेश्वर असे गंभीर जखमीचे नाव असून ते विजयपूरच्या बागेवाडी येथे राहणारे आहेत. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने तत्काळ बाजूला करण्यात आली.




























































