
सामना ऑनलाईन । मुंबई
भांडुपमध्ये एका तरुण क्रिकेटपटूची सुऱ्याने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे भांडूपमध्ये खळबळ उडाली आहे. राकेश पवार असे त्या क्रिकेटपटूचे नाव असून तो लहान मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देतो.
Maharashtra: A local cricketer Rakesh Panwar was stabbed to death by three unknown assailants in Bhandup, Mumbai, last night. Police investigation underway. pic.twitter.com/8C1aoCKgLb
— ANI (@ANI) June 7, 2019
गुरुवारी रात्री राकेश हा भांडुपमधील महावीर पेट्रोल पंपावर गेला होता. त्यावेळी तेथेच लपून बसलेल्या तिघांनी त्याच्यावर चाकून सपासप वार केले. या हल्ल्यात राकेशचा जागीच मृत्यू झाला. राकेशच्या पश्चात पत्नी व दोन मुलं आहेत.
राकेश हा एक स्थानिक क्रिकेटपटू असून तो एका क्लबमध्ये लहान मुलांना क्रिेकेटचे प्रशिक्षण देत होता. राकेशच्या हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.


























































