पोक्सोतील नराधमाला जन्मठेप

कोरोना लॉकडाऊनमध्ये पत्नी-मुलांना गावाला पाठवून मित्राच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱया नराधमाला पोक्सो न्यायालयाने जन्मठेप ठोठावली. वारंवार बलात्कार केल्यानंतर 14 वर्षांची पिडीत मुलगी गरोदर राहिली. या घटनेचे गांभीर्य विचारात घेत न्यायाधीश आदिती कदम यांनी आरोपी पोपट देशमुखला पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवल.

मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. 35 वर्षीय पोपट देशमुखने जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मित्राच्या मुलीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि तिला गरोदर केले. त्यानंतर या प्रकाराबाबत कोणाला काहीही न सांगण्यासाठी धमकी दिली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील विणा शेलार यांनी ठोस पुरावे सादर करण्याबरोबरच आठ साक्षीदार तपासले. पिडीत मुलीचे वडिल आणि आरोपी एकाच घरात नोकर म्हणून कामाला होते. पीडित मुलगी 24 आठवडय़ांची गरोदर असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता.