
गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला सत्ता मिळाली नसली, तरी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. याविषयी बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, गुजरातमध्ये 5 जागा जिंकणं तेवढंच अवघड आहे, जेवढं बैलाचं दूध काढणं. आम्ही तर बैलाचं दूध काढलं.
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक रविवारी दिल्लीत पार पडली. ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर झालेल्या पक्षाच्या पहिल्याच बैठकीत गेल्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा अरकिंद केजरीवाल यांनी घेतला. यावेळी, ते म्हणाले, गुजरातमधील कामगिरीबद्दल एका व्यक्तीने सांगितलं की, गाईचे दूध कोणीही काढू शकते. पण, आम्ही तर बैलाचं दूध काढलं आहे. 2027 साली आपला पक्ष गुजरातमध्ये निश्चितच सरकार बनकणार, असा निर्धार केजरीवाल यांनी व्यक्त केला. .



























































