
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून ईशान्येकडील राज्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जम्मू-कश्मीरमधून सीआरपीएफच्या 10 तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे.
गुवाहाटीसह अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले असून काही ठिकाणी संतप्त जमावाने टायर जाळले. तर काही ठिकाणी आंदोलकांनी तोडफोड केल्याचे वृत्त आहे. याचपार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.येथील दिब्रूगडमध्येही आंदोलनकर्ते आणि जवान यांच्यात बाचाबाची झाली. हे विधेयक लागू झाल्यास ईशान्येकडील राज्यांचे विशेषाधिकार काढले जातील , कमी होतील अशी नागरिकांना भीती आहे. यामुळेच येथील राज्ये या विधेयकाविरुद्ध एकत्र आली आहेत.
मणिपूरमध्येही आंदोलन सुरू झाले आहे. हे विधेयक मागे न घेतल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा मणिपूर स्टुडंट युनियनने सरकारला दिला आहे.



























































