आभाळमाया – नक्षत्रनामांच्या आधुनिक पद्धती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<वैश्विक >>

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांचे नक्षत्रनामांचे एकोणिसाव्या शतकातील योगदान हिंदुस्थानात खगोल अभ्यास करणाऱ्यांच्या दृष्टीने मोठेच होते. सध्या सर्वत्र इंग्लिश खगोलीय नकाशांमुळे इंग्लिश नावेच प्रसिद्ध असली तरी त्यातही मूळची अरबी (जसे: अल्देबेरान म्हणजे रोहिणी) अशी नावे आहेतच. मराठीतूनच मुख्यत्वे खगोलशास्त्राचा अभ्यास व्हावा आणि जरूर तिथे इंग्लिशचा वापर करावा अशा उद्देशाने ‘खगोल मंडळ’ कार्य करत असते. त्यामुळे आमचे कार्यक्रम मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये होतात. त्यामध्ये मराठी नक्षत्रनामे सांगताना बाळशास्त्रींनी सुचविलेल्या नावांचा काही नावे बदलून उपयोग होतो.

त्यांच्या नक्षत्रनामांमधील आणखी नावे (म्हणजे मागील लेखात न आलेली) अशी आहेत- वाताकर्ष (अ‍ॅन्टीलिया), चषक (व्रेटर), द्वाक्ष पिंवा हस्त (कोर्वस), नरतुरंग (सेन्टारस), वृक (लूपस), रेखाटणी-अंकनी (नॉर्मा), कर्काटक (सेर्सिनस), दक्षिण त्रिकोण (ट्रग्युलस ऑस्ट्रेलिस), स्वस्तिक-त्रिशंकू (क्रक्स), दक्षिण मक्षिका (मस्का ऑस्ट्रेलिस), वायुभक्ष (कॅनिलियन), पीठ (आरा), यम (इन्डस), शिखावल-मयूर (पेव्हो), बक (ग्रस), कपोत (एपम), वसुभाग-अष्टक (ऑक्टन्स), कालयंत्र (होरोलॉजियम), जालक (रेटिक्युलस), अलगर्द (हायड्रस), कारंडव (टूकाॅन), टंक (स्कल्पटोरिया), चित्रफलक (इक्युलस पिक्टोरियम), अर्सिदंष्ट्र (डोरॅडो), नौका (अर्गोनेव्हिस), तिमि (पायसिस व्होलॅन्स) एवढी 54 नावे बाळशास्त्रीनी अभ्यासपूर्वक दिली आहेत. त्यांच्या अल्प जीवनाच्या अनेक तेजस्वी पैलूंपैकी खगोल अभ्यास हा एक (रवींद्र बेडकिहाळलिखित त्यांचे चरित्रखंड जरूर वाचा.)

आता पाश्चात्य पद्धतीने नक्षत्रनामे देण्याची सुरुवात कधी झाली ते पाहू. आपली 27 नक्षत्रे रामायण-महाभारतकाळापासून किंवा त्यापूर्वीही आपल्याला ज्ञात होती. आधुनिक खगोलशास्त्र्ाातील तारकासमूहांच्या नावांविषयी मात्र त्या त्या संशोधकाच्या नाव आणि काळासह निश्चित माहिती उपलब्ध आहे.

विविध तारे आणि तारकासमूहांचे नामकरण पिंवा बारसे कसे व कधी झाले याची माहिती प्रदीप नायक यांच्या तारांगण या सर्व तारकासमूहांची सचित्र, सोप्पी, परंतु समग्र माहिती देणाऱया पुस्तकात मिळते. खगोल प्रकाशनाचे हे पुस्तक खगोल अभ्यासकांच्या संग्रही असायला हवे.

या लेखाच्या निमित्ताने प्रदीप नायक यांच्याशी संपर्प साधला. त्यांनी सांगितले की, 16 व्या शतकातील नकाशातज्ञ आणि व्यावसायिक वकील असलेल्या जॉन बायर यांनी 1603 मध्ये ‘बायर डेझिग्नेशन’ या पद्धतीची ग्रीक मुळाक्षरांवरून ताऱयांना नावे देण्याची पद्धत सुरू केली. त्यांच्या युरॅनोमेट्रिया या ग्रंथात अवकाशस्थ वस्तूंसाठी (तारे वगैरे) त्यांच्या तेजस्वीतेनुसार उतरत्या क्रमाने नावे दिली. उदा. सिंह म्हणजे लिओसाठी ‘लिओनिस’, तर मेष म्हणजे ‘एरिझ’ला एरिटिस म्हटले. त्याचप्रमाणे या तारकासमूहांमधील ताऱयांची वर्गवारी तेजस्वीतेनुसार उतरत्या पद्धतीने अल्फा, बीटा, गॅमा या प्रकारे केली. मात्र ग्रीक मुळाक्षरे चोवीसच असल्याने उरलेल्या असंख्य ताऱ्यांना नावे कशी द्यायची हा प्रश्नच होता.

तो जॉन फ्लॅमस्टिड यांनी सोडवला. त्यांनी मुळाक्षरांऐवजी अंक वापरले. उदा. मेष तारकासमूहातील 41 एरिस अथवा हंस तारकासमूहातील 61 सिग्नि फ्लॅमस्टिड यांनी पश्चिम ते पूर्व अशी तारकासमूहांची नोंदणी केली. ते रॉयल अॅस्ट्रॉनॉमर (राजज्योतिषी) म्हणजेच खगोल अभ्यासक होते. त्यांनी सुमारे 2935 ताऱ्यांचे नामकरण केले.

अतिशय अंधुक तारे त्यांच्या अवकाशस्थ स्थानानुसार वेगवेगळ्या अद्याक्षरांनी नोंदले गेले आहेत. अनेक खगोल अभ्यासकांनी अंधुक जोडताऱ्यांंचीही निरीक्षणे करून स्वतःची नामावलीही बनवली. यापैकी एटकेन यांनी ‘एडीएस’, तर स्टव्ह यांनी ‘सिग्मा’ डेनलॉप यांनी ‘डेल्टा’ आणि हर्षल (नेपच्युन) ग्रहांचा शोध लावणाऱया विल्यम हर्षल यांचे खगोल अभ्यासक चिरंजीव जॉन हर्षल यांनी एच अशा याद्या (लिस्ट) तयार केल्या. त्यातील तारे डेल्टा 53 पिंवा सिग्मा 2153 असे दाखवता येतात.

‘चार्लस मेसिए (1730-1817) यांचं नाव तारकासमूहांच्या यादीसाठी प्रसिद्ध आहे. ते मूळतः धूमकेतू संशोधक होते. त्या वेळी त्यांना काही इतर धूसर पुंजके दिसत. ते मात्र धूमकेतू नाहीत हे लक्षात येताच त्यांनी इतर धूमकेतू निरीक्षकांची दिशाभूल होऊ नये म्हणून अशा ‘पुंजक्यांची’ वेगळी यादी प्रसिद्ध केली. त्यात अनेक तारकागुच्छ (स्टारक्लस्टर), तेजोमेघ (नेव्युले) आणि दीर्घिका (गॅलॅक्सी) होत्या. अशा 110 वस्तूंना ‘एम’ या मेसिए यांच्या नावाच्या अद्याक्षरावरून ओळखले जाते. उदा. एम-42 म्हणजे मृग तारकासमूहातील (नक्षत्रातील) तेजोमेघ.

याव्यतिरिक्त जॉन हर्षल यांनी जनरल पॅटेलॉग या नावानेही कित्येक तारकासमूहांची यादी तयार केली. त्यात पुढे 1888 मध्ये जॉन ड्रेअर यांनी भर घालून न्यूजनरल पॅटेलॉग ही 8000 अवकाशीय वस्तूंच्या नावांची यादी प्रसिद्ध केली. त्यातही पुढे 1905 मध्ये इन्डेक्स पॅटेलॉग ही 5000 वस्तूंची नावे आली. अशा प्रकारे विश्वाचा पसारा माणसाला जसजसा ज्ञात होत गेला तशी त्यातील अनेक अवकाशस्थ वस्तूंची नामकरणं (किंवा संख्याकरणं) झाली.

नायक यांच्या या बहुमोल माहितीबरोबरच 19 व्या शतकात तुटपुंज्या साधनसामग्रीच्या काळात तारकासमूहांच्या काही पाश्चात्त नावाचं चपखल हिंदुस्थानीकरण करण्याचं बाळशास्त्रीचं कामही उल्लेखनीय!

[email protected]