मनपा प्रशासनाची एकाच दिवशी पाच ठिकाणी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

शहरात आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन मालमत्ता कर वसुलीची मोहीम जोमात सुरू करण्यात आली आहे. यासाठी आता मनपाचे कर्मचारी कामाला लागले असून त्यांनी दोन दिवसात ११ ठिकाणी कारवाई करत गाळ्यांना सील केले आहे. आज एका मालमत्ता धारकाने संपूर्ण रकमेचा धनादेश ४ लाख ७३ हजार २७६ दिला. यावरुन त्यांच्यावरील कारवाई टळली आहे. शहरात मालमत्ता कराची वसुली जोमात सुरु करण्यात आली असून, दोन दिवसात अकरा ठिकाणी मनपाच्या पथकाने कारवाई केली आहे.

आज मालमत्ता कर विभागाच्या कर्मचार्‍यांनी रेणावीकर कॉलनी येथील चंद्रमा कन्स्ट्रक्श्‍न्सचा गाळा ३ लाख ५३ हजार ३१५ रुपयांच्या वसूलीसाठी सील केला. राम तायगा लोखंडे यांचा गाळाही २ लाख ५६ हजार ७१७ रुपयांसाठी सील करण्यात आला. रवींद्र बाळासाहेब खराडे रजनीगंधा अपार्टमेंट रु.७८ हजार ५००ची कर वसूली थकीत असल्याने सील करण्यात आला. बि. एम. मंडल, कॉलनी रुपये १ लाख ३८ हजार ३२७ च्या थकबाकी करीता दोन रुम सील करण्यात आले. तर हिरादेवी ज्ञानदेव काकाणी यांच्याकडे ४ लाख ७३ हजार २७६ रुपये थकीत असल्याने त्यांनी वसुली करण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांना संपूर्ण रकमचा धनादेश दिला. यावरुन त्याच्यावरील कारवाई टळली आहे.

ही कारवाई कर निरीक्षक संजय उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली बबन काळे, कन्हेरकर, पिचड, अनिल पवार, कांबळे, जाधव, वाकळे, पाशा शेख, ठुबे, लहारे, फटांगरे आदींनी केली.