
नियम मोडून वाहतुकीचे तीनतेरा वाजविणाऱयांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांनी आजपासून धडक मोहीम हाती घेतली आहे. बेजबाबदार चालक, अनधिकृत फेरीवाले आदींवर कारवाई करून त्यांना शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. बेजबाबदार चालक, फेरीवाले, रस्त्यावर गॅरेज खोलणारे यांच्यामुळे वाहतुकीची शिस्त बिघडते. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होऊन बऱयाचदा नको ते अनुचित प्रकारदेखील घडतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेत अशा अपप्रवृतींना वेळीच रोखण्यासाठी धडक मोहीमच हाती घेतली आहे.
पोलिसांनी आजपासून रस्त्यावर बेकायदेशीर गॅरेज चालविणारे, रेल्वे स्थानकांबाहेर वाहतुकीची शिस्त न पाळणारे, बेजबाबदार रिक्षा, टॅक्सी चालक, डबल पार्ंकग, कॉर्नर पार्ंकग, बस स्टॉपवर पार्ंकग आणि मुख्य रस्त्यावर होणारी पार्ंकग तसेच फेरीवाले, विरुद्ध दिशेने गाडी चालविणारे, विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्याच्या वाहतूक पोलिसांनी रडारवर आणले आहे.


























































