
>>संजय मोने
तो विश्वनाथ विजय विजापुरे… त्या काळात वडिलांच्या नावाने हाक मारायची प्रथा होती. तर त्याला त्या काळात आम्ही सगळे विज्या म्हणायचो. कॉलेजात बऱयाच विद्यार्थ्यांना विविध सवयी जडतात. बऱयाच जणांच्या त्या सुटतात, तर काही जणांच्या बाबतीत त्या सवयीचं व्यसनात रूपांतर होतं. पुढे काही जणांची व्यसनंही सुटतात. तर मोजक्या काही जणांच्या बाबतीत ती आयुष्याच्या अंतापर्यंत साथ देतात. विश्वनाथ विजय विजापुरेला कुठलंही व्यसन नव्हतं. धूम्रपान, मद्यपान, तंबाखू वगैरे सगळय़ापासून तो अलिप्त होता. मात्र त्याला एकच जबरदस्त व्यसन होतं…सिनेमा! त्याच्या खिशात कायम पुढच्या किंवा पाहून आलेल्या सिनेमाचं तिकीट असायचं.
सध्या तो कुठे असतो माहीत नाही. त्यामुळे काय करत असेल ते कळायला काही मार्ग उपलब्ध नाही. तितकी त्याची माझ्याशीच काय, कॉलेजमध्ये कोणाशीच तशी खास मैत्री किंवा घसट नव्हती. त्यामुळे त्याचं वय त्या काळात आमचं होतं साधारण तितकंच होतं. त्यामुळे आज तो साठीपार असणार एवढंच काय ते ठामपणे सांगता येईल. अजून एक गोष्ट त्याच्याबद्दल खात्रीनं सांगता येईल ती म्हणजे त्याचं नाव. कारण तो स्त्राr नसल्याने ते बदलण्याची शक्यता नाही. तर तो विश्वनाथ विजय विजापुरे (त्याच्या नावामुळे तो स्वतला ‘ट्रिपल वी’ म्हणायचा. बिचारा तो एकटाच तसं म्हणायचा. त्या काळात वडिलांच्या नावाने हाक मारायची प्रथा होती. पुढे ती बराच काळ म्हणजे परंपरा व्हायच्या मार्गावर असेपर्यंत सुरू होती. तर त्याला त्या काळात आम्ही सगळे विज्या म्हणायचो.). त्याला कोणीही विशेष ओळखत नव्हतं हे मगाशी मी म्हणालो. जरा हे विचित्र वाटेल, पण त्याचे वडील हे सरकारी नोकरीत होते आणि तेही सतत बदली होणाऱया खात्यात. त्यामुळे तो असाच पुण्याला कॉलेजात आला.
बऱयाच ठिकाणी शालेय शिक्षण घेतल्यामुळे त्याच्या बोलण्यात महाराष्ट्रातल्या अनेक विभागांचा हेल होता. पुण्यात मात्र त्याचा मुक्काम अनेक वर्षे असणार होता हे त्याच्याशी झालेल्या अत्यंत तुटक अशा संभाषणातून लक्षात आलं होतं. कॉलेजात बऱयाच विद्यार्थ्यांना विविध सवयी जडतात. बऱयाच जणांच्या त्या सुटतात, तर काही जणांच्या बाबतीत त्या सवयीचं व्यसनात रूपांतर होतं. पुढे काही जणांची व्यसनंही सुटतात. तर मोजक्या काही जणांच्या बाबतीत ती आयुष्याच्या अंतापर्यंत साथ देतात. विश्वनाथ विजय विजापुरेला कुठलंही व्यसन नव्हतं. धूम्रपान, मद्यपान, तंबाखू वगैरे सगळय़ापासून तो अलिप्त होता. मात्र त्याला एकच जबरदस्त व्यसन होतं…सिनेमा! त्याच्या खिशात कायम पुढच्या किंवा पाहून आलेल्या सिनेमाचं तिकीट असायचं.
जरी त्या काळात सकाळचा 10.30-11.00 चा स्वस्त दराचा खेळ पाहायचा तरी दीड रुपया लागायचा. घरून आम्हाला खर्चासाठी दरमहा पैसे मिळायचे, त्यात काहीतरी लटपटी करून एखाददुसरा सिनेमा जमवता यायचा आणि विश्वनाथ सुमारे बारा-पंधरा चित्रपट महिनाकाठी बघायचाच. तिसरा सिनेमा एका महिन्यात बघायचा हे आम्हाला शक्यच नव्हतं. घरून पैसे मागायची आणि ते मिळायची शक्यताच नव्हती. तोंडाला रंग लावून घराण्याचं नाव घालवणार का? ज्याचं उत्तर देता येणार नाही असा प्रश्न घरचे विचारतील ही दहशत होती. मग विश्वनाथ पैसे कुठून आणायचा? त्यासाठी तो एका किराणा दुकानात सकाळी दोन तास आणि संध्याकाळी तीन तास अर्धवेळ नोकरी करायचा. मात्र नोकरी, अभ्यास आणि सिनेमा यासाठी तो व्यवस्थित वेळ सांभाळायचा. सिनेमाची खास आवड अशी त्याला नव्हती. ज्या तल्लीनतेने तो ‘भक्त पुंडलिक’ बघायचा, त्याच तन्मयतेने तो ‘मदिने की गलियाँ’ बघायचा. ताब्रेज नावाचा एक नरपुंगव नायक हिंदी सिनेमात आहे हे त्याच्यामुळे आम्हाला माहीत झालं होतं. विजयेंद्र घाटगे, हेमंत बिर्जे, दीपक पराशर, धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना एवढंच काय, साक्षात अमिताभ बच्चन हे सगळे त्याच्या रसिकतेच्या तागडीत एका मापाने तोलले जायचे. काही काही चित्रपट तर त्याने नवीन दुसरे प्रदर्शित झाले नाहीत म्हणून वीस-पंचवीस वेळा पाहिले होते. त्याच्या असण्याची चित्रपटगृहातल्या पोत्यांना इतकी सवय झाली होती की, कधी कधी त्याला फुकट चहाही पाजायचे.
त्याला त्या काळात पडद्यावर काळोख दाखवून कलात्मक चित्रपट निर्माण करणारे सिनेमे मात्र अजिबात आवडायचे नाहीत. न कळणारे चित्रपट उघड उघड प्रदर्शित करण्यापेक्षा ते निर्माते आणि दिग्दर्शक आपल्या घरात बसून का नाही बघत? असा प्रश्न त्याला पडायचा आणि त्याचं उत्तर म्हणून तो ‘मंगू उस्ताद’ वगैरे चित्रपट बघायचा.
त्या काळात या सिनेमांच्या नादाला लागून फुकट गेलेल्या एका विद्यार्थ्याने “तळागाळातल्या लोकांच्या समस्या तुम्हा सुखात लोळणाऱया लोकांना काय कळणार? पलायनवादी सिनेमांचे प्रेक्षक तुम्ही,” असं म्हणून हल्ला केला. त्याने शांतपणे नुकत्याच पाहून आलेल्या सिनेमाच्या तिकिटाची सूरनळी केली आणि मग्न होऊन कानात घातली. काही काळानंतर तो बोलायला लागला. “तू म्हणतोस तो सिनेमा मी तिसऱया दिवशी पाहायला गेलो होतो. दोन दिवसांत तिथे फक्त सात सामोसे आणि आठ-दहा चहाची पी झाली होती. ते पोते काही सुखात लोळत नाहीत ना? ते तळागाळातील आहेत ना? त्यांच्या समस्यांकडे तुझ्या त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाने पाहायला नको? त्या चित्रपटाने एका आठवडय़ात थिएटरमधून पलायन केलं. बाजूलाच आमचा ‘लोफर’ नावाचा चित्रपट चाळीस आठवडे ठाण मांडून आहे. मग पलायनवादी चित्रपट कुठले? आपल्याला कळतं की, समोर आपल्याला दिसतंय ते खरं नाही. तरी आपण बघत राहतो ना? ‘अमर अकबर अँथनी’ नावाच्या सिनेमात खलनायकाचा नि:पात करायला अमर अकबर आणि अँथनी आमूलाग्र वेषांतर करून येतात आणि मारामारीच्या आधी गाणं झालं पाहिजे या परंपरेला अनुसरून एक गाणं म्हणतात. कुठलं? ‘अनहोनी को होनी करदे, होनी को अनहोनी, एक जगह जब जमा हो तीनो, अमर अकबर अँथनी.’ इतकी उघड उघड आपल्या असण्याची कबुली त्या खलनायकाला द्यायचे तर मग वेषांतर कशाला? पण हा विचार चित्रपट पाहताना ना आपल्या मनात येत, ना पडद्यावर खलनायकाच्या लक्षात येत. आपली ऐपत नाही हे लक्षात येऊनही दुकानाच्या बाहेर उभं राहून शोकेसमधल्या गोष्टी आपण मनातल्या मनात विकत घेतोच ना? हे बघ, सिनेमा हा मनोरंजनासाठी असतो, बाकी शिक्षण वगैरे देणं यासाठी शाळा-कॉलेज आहेत.”
समोरचा पूर्णपणे आडवा झालाय हे कळल्यावर तो पुढे म्हणाला, “चल सोड, ‘जॉनी मेरा नाम’ बघायला चल. मी सदतीसवेळा पाहिलाय. आज तुला समजावून सांगतो.” हल्ली सिनेमाचे दर पाचशे-सातशेच्या घरात गेले आहेत. बरेचदा ते बघताना झोप आवरत नाही हे लक्षात आल्यामुळे तीही व्यवस्था असणारी आसनं असतात. त्याचे दर हजार-बाराशे रुपये असतात. त्या काळात विश्वनाथ वर्षाला सुमारे पावणेदोनशे सिनेमे बघायचा. आज या वयात कदाचित पन्नास-शंभर चित्रपट बघत असेल. जर कधी हा आमचा सिनेमावाला भेटला तर त्याला विचारायचंय…“विज्या, इतके सिनेमे बघण्याएवढे पैसे तू मिळवतोस का रे? सिनेमा आवडला तर दिवसाला तोच चित्रपट पुन्हा दोन-तीनदा बघायचास. आता ती सोय जवळ जवळ नष्ट झालेली आहे. दिवसभरात वेगवेगळे चार खेळ असतात. मग अशा वेळी तू काय करतोस?”





























































