
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या ’जर्सी’ या चित्रपटाच्या शूटिंगला शाहीद कपूरने पुन्हा सुरुवात केलीय. उत्तराखंडमधील शेडय़ुल संपवून आता तो मुंबईत परतलाय. या चित्रपटात शाहीद क्रिकेटरची भूमिका साकारतोय. या पुढच्या शेड्युलमध्ये शाहीदवरील क्रिकेटच्या दृष्यांचे शूटिंग होणार आहे. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी सध्या तो भल्या पहाटे उठून क्रिकेटच्या मैदानात घाम गाळताना दिसतोय. नेट प्रॅक्टीस करतानाचे काही पह्टो त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केले आहेत. सोबत ’गेट अप अँड गेट गोईंग. मॉर्निंग ऑल’ असे कॅप्शन त्याने दिलेय. या पह्टोत शाहीद ग्लोव्हज, पॅड, हेल्मेट घालून एखाद्या प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे क्रिकेट खेळताना दिसतोय. त्याच्या पह्टोला चाहत्यांचीही पसंती मिळतेय.

























































