ज्येष्ठ अभिनेत्री आशू यांचे निधन

1451

मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटविणाNया ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्पâ आशू (वय 75) यांचे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या मागे पती आणि मुलगा असा परिवार आहे.

ललिता देसाई यांचा जन्म 21 जानेवारी 1945 साली झाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

लग्नाची बेडी, गुंतता हृदय हे, नाथ हा माझा, अपराध मीच केला, तुज आहे तुझपाशी, अभिलाषा, मॅडम अशा मराठी नाटकांमध्ये केलेल्या ललिता देसाई यांच्या भूमिका गाजल्या. आचार्य अत्रे यांच्या ‘ब्रह्मचारी’ या नाटकातील किशोरी या व्यक्तिरेखेने त्यांना ओळख मिळवून दिली. आचार्य अत्रे यांच्याच ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे त्यांनी एक हजाराहून अधिक प्रयोग केले. या नाटकातील ‘रश्मी’ या त्यांच्या भूमिकेचे खास कौतुक झाले. मराठी नाटकांसोबत चित्रपटांमधीलही त्यांची कारकीर्द गाजली. ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्या सहअभिनेत्री म्हणून पडद्यावर झळकल्या होत्या.

मराठी नाटकांबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही ललिता देसाई यांनी आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘कब, क्यू और कहाँ’, ‘सीता और गीता’, ‘अमर प्रेम’, ‘संतान’, ‘यादों की बारात’ या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या चरित्र नायिकेच्या भूमिका विशेष गाजल्या. नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना भार्गवराम आचरेकर पुरस्कारासह अनेक पुरास्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या