अभिनेत्री जॅकलीनने इंस्टावर गाठला नवा ‘माईलस्टोन’, टॉपलेस फोटो शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

लॉकडाऊन काळात चित्रपट, मालिका यांचेही काम थांबलेले होते. यामुळे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होते. सोशल मीडिया हा सध्या चाहते आणि कलाकार यांच्यातील संवादाचा एक दुवाच झाला आहे. एखाद्या उत्पादनाच्या पब्लिसिटी पासून ते चित्रपटाच्या प्रमोशन पर्यंत सर्व काही सोशल मीडियावर होते, तसेच हा एक कमाईचा चांगला पर्याय देखील आहे. जेवढे फॉलोअर्स जास्त तेवढा पैसा अधिक.

नुकताच अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने इन्स्टाग्रामवर नवा माईलस्टोन गाठला. जॅकलीन हिचे इन्स्टाग्रामवर 46 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. यानंतर तिने टॉपलेस फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

गुलाबाचा गुच्छ हातात घेऊन जॅकलीनने हा फोटो काढला आहे. याच्या सहाय्याने तिने आपले शरीर झाकले आहे. या फोटोवर 46 मिलियन आणि खाली ‘थँक्स, लव्ह यू’, आई कॅप्शन देण्यात आले आहे.

screenshot_2020-10-24-16-51-45-564_com-android-chrome

दरम्यान, जॅकलीन ‘किक 2’, ‘भूत पुलिस’ आणि अटैक’, या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘किक 2’ मध्ये ती सलमान खान सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर ‘भूत पुलिस”मध्ये सैफ अली खान आणि ‘अटैक’मध्ये जॉन अब्राहिम सोबत दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या