अदानी ग्रूपसाठी केंद्राने नियम धाब्यावर बसवले, काँग्रेस खासदार वेणुगोपाल यांचा आरोप

255

देशातील सहा विमानतळे अदानी ग्रूपच्या ताब्यात देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी निशाणा साधला. मोदी सरकारने अदानी ग्रूपसाठी नियमावलीचे  उल्लंघन केले. सहाही विमानतळांच्या निविदा अदानी ग्रूपला जिंकता याव्यात यासाठी नियमात मनमानी बदल केले, असा आरोप खासदार वेणुगोपाल यांनी संसदेत केला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसने मोदी सरकारवर गंभीर आरोपांची तोफ डागली. देशातील मुंबई, लखनौ, जयपूर, अहमदाबाद, मंगळुरू व तिरुवनंतपुरम् या सहा विमानतळांच्या देखरेख आणि संचालनासंबंधित निविदा अदानी ग्रूपने जिंकल्या आहेत. मुळात एकाच खासगी कंपनीकडे अशाप्रकारे सहा विमानतळांची जबाबदारी सोपवणे हे नियमावलीचे सरळसरळ उल्लंघन आहे. मोदी सरकारने यासंबंधी आपल्याच मंत्र्यांनी तसेच विभागांनी दिलेले सल्ले आणि सूचनांना जुमानले नाही. नियमांमध्ये मनमानी बदल केल्यामुळेच अदानी ग्रूप सहाही विमानतळांच्या निविदा जिंकू शकला, असा दावा वेणुगोपाल यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या