आता पाटणकर पोलीस बनवून घाबरवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ मधील शेवंताचा नवरा आठवतोय का? ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या दुसऱ्या पर्वात पाटणकरांनी सर्वांनाच भूत बनवून धडकी भरवली होती. या भूमिकेनंतर पाटणकरांची व्यक्तिरेखा साकारलेला अधिश पायगुंडे आता ‘झटका: आत्ता सुरुवात गोंधळाची’ या कॉमेडी थ्रिलर चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटातील नायक आणि नायिकेच्या मागे अधिश हात धुवून पाठी लागतो. अभिनेत्री पूर्णिमा डे आणि नवोदित अभिनेता गौरव उपासानी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झटका’ हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात एका अनोळखी व्यक्तीचा खून होतो, या अनोळखी व्यक्तीचं आणि नायक-नायिकेचा काय संबंध असतो ? खून नक्की कोणी केला आहे ? पोलिस अधिश पायगुंडे या खूनाचा छडा कसा लावतो ? खुन्याचा शोध लावण्यासाठी अधिश अक्षरशः नायक-नायिकेच्या रॉमान्सला फुल्लस्टॉप लावतो, त्यासाठी अधिश नक्की काय करतो, याची उत्तम कहाणी लेखक म्हणून अभिनेता गौरव उपासनी यांनी मांडली आहे. गौरव उपासनी ‘झटका’ चित्रपटाचा एक्झेक्युटीव्ह प्रोड्युसरही आहे.

उत्तेजना स्टुडियोजची निर्मिती असलेल्या ‘झटका’ चित्रपटाचे डॉ पार्थसारथी, प्रेरणा उपासनी निर्माते आहेत. दिग्दर्शक अजिंक्य उपासनी यांनी ‘झटका’ या चित्रपटाची सिनेमेटॉग्राफीही केली आहे. यासह गौरव उपासनी आणि अजिंक्य उपासनी या बंधूनी चित्रपटाचा स्क्रिनप्लेही लिहिली आहे. ‘झटका: आत्ता सुरुवात गोंधळाची’ चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित होईल.