वीज चोरी प्रकरणी ग्राहकाला कारावास

वीज चोरी करणे नगर जिल्ह्यातील एका वीज ग्राहकाला चांगलेच महागात पडले आहे. पाराजी नारायण रोकडे यांनी वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरीचा सपाटा लावला होता. या प्रकरणी नगर जिल्हा न्यायालयाने त्याला दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.

महावितरणच्या अधिकाऱयांनी नोव्हेंबर 2016मध्ये नगर जिह्यातील निंबळाक येथील वीजग्राहक पाराजी रोकडे यांच्या अजित फूड्स या कंपनीच्या वीजमीटरची तपासणी केली होती. त्यामध्ये वीज जोडणी मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करत असल्याबाबत निदर्शनास आले होते. त्यांनी तीन महिन्यांत तब्बल 4 लाख 24 हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी महावितरणने रोकडे यांचेविरुद्ध एमएससीबी पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल केला होता.