एअर इंडिया-विस्ताराचे होणार विलीनीकरण

एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाईन्सच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विस्तारा एअरलाइन्समधील भागीदार असलेल्या सिंगापूर एअरलाइन्सच्या संचालक मंडळाने विलीनीकरणास मान्यता दिली आहे. करारानुसार, टाटाचे 74.9 टक्के आणि सिंगापूर एअरलाईन्सचे 25.1 टक्के समभाग असणार आहेत. टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सने मंगळवारी याबाबत घोषणा केली. 2024 पर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आपले लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.