राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालच! कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-doval-modi

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांना कायम ठेवण्यात आले असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. डोवाल यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये डोवाल यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

2014 साली नरेंद्र मोदी यांचे सरकार पहिल्यांदा सत्तेत आले, तेव्हा अजित डोवाल यांची हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. उरी येथील दहशतकादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानी  जवानांनी पाकक्याप्त कश्मीरमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकवेळी रणनीती आखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डोवाल यांनी ‘आयबी’मध्ये अनेक वर्षे सेवा केली आहे. ‘आयबी’चे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये तब्बल सहा वर्षे वास्तव्य केले आहे. 1988 मध्ये त्यांना ‘कीर्ती चक्र’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले पोलीस अधिकारी आहेत.