
महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे असे विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खास शैलीमध्ये समाचार घेतला. कर्नाटकच्या निकालानंतर कार्यकर्त्यांना बुस्ट देण्यासाठी केलेले हे भाषण असून असे बोलावे लागते. त्यांच्याच्यागी आम्ही असतो तरी असेच भाषण केले असते, असे अजित पवार म्हणाले.
आगामी काळामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना बुस्ट देण्यासाठी केलेले ते राजकीय भाषण होते. ते फार गांभिर्याने घ्यायची गरज नाही, असेही अजित पवार म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
कुणाचा पोपट मेलाय ते जनताच दाखवेल, संजय राऊत यांची घणाघाती टीका
ते पुढे म्हणाले की, पोपट मेला, अरे दाखवा तरी कुठे पोपट मेलाय तो. उगं त्यांनी म्हणायचे पोपट मेला, आम्ही म्हणायचे मैना मेली, कुणी म्हणायचे मोर मेला. कुणी मेलेले नाही, सगळं काही जनतेच्यासमोर आहे. जनतेच्या मनात जे असते ते जनता करून दाखवते. जनतेचा तो अधिकार आहे, जो संविधानाने त्यांना दिलेला आहे. त्यामुळे, पोपट मेला, पोपटीन मेली असे म्हणण्याचे काही कारण नाही. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही. काँग्रेसला सुद्धा पराभव पत्कारावा लागला आहे.
हाफ चड्डी घालून दर्शनाला येऊ नका असे कोणत्या देवाने सांगितले? अजित पवार यांचा संतप्त सवाल


























































