
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज राज्यातील बारा मतदान केंद्रांवर मतदान झाले. दिवसभरात तब्बल 3403 सभासद मतदारांपैकी केवळ 1698 जणांनी मतदान केले. त्यामुळे मतदानाची टक्केवारी केवळ 49.90 टक्के इतकीच राहिली. निम्म्याहून अधिक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. उद्या कोल्हापुरातील गडकरी सभागृहात मतमोजणी होणार आहे.


























































