अकोला जिल्ह्यातील युवासेनेचे (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अकोला जिह्यातील युवा सेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

उप-जिल्हा युवती अधिकारी- नंदिती पाटीखेडे (अकोला), उप-जिल्हा समन्वयक – खुशी भटकर (अकोला), तालुका युवती अधिकारी – रेणु शेळके (बाळापूर), शहर युवती अधिकारी – चंचल चोपडे (अकोला पूर्व), पूनम पिसे (अकोला पूर्व), सोनाली राऊत (अकोला पश्चिम), उप- शहर युवती अधिकारी – अंजली देव (अकोला पश्चिम), वैशाली राऊत (अकोला पूर्व), कांचन पवनीकर (अकोला पश्चिम), शहर समन्वयक – भाग्यश्री निमसे (अकोला पश्चिम), काजल बडदिया (अकोला पश्चिम), अवंती मापारी (अकोला पश्चिम), पूनम दही (अकोला पश्चिम),  विभाग युवती अधिकारी – साक्षी गायकवाड (अकोला पश्चिम), विद्या झाले (अकोला पूर्व), उप- विभाग युवती अधिकारी – शीतल बडदिया (अकोला पश्चिम).