
शिर्डी मतदारसंघाचे गद्दार खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. वाघचौरे यांची जन्मभूमी असलेल्या अकोल्यामध्ये संतापाचा ज्वालामुखी फुटला असून शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत, पायाखाली तुडवत निषेध केला.
लोकसभा निवडणुकीवेळी भाऊसाहेब वाघचौरे यांना अकोल्यातून 55 हजार मतांची आघाडी मिळाली होती. या जोरावर त्यांनी दिल्ली गाठली. मात्र शिवसैनिकांच्या विश्वासाला तडा देत मलिद्यासाठी पक्षांतर करणाऱ्या भाऊसाहेब वाघचौरे यांच्याविरोधात आता संपाताची लाट पसरली आहे. अकोल्याच्या जनतेशी विश्वासघात करणाऱ्याला या मातीत जागा नाही, असा इशारा देत शिवसैनिकांनी भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्याने मारले.
अकोले बसस्थानक परिसरात झालेल्या आंदोलनात जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी, तालुकाप्रमुख संतोष मुतडक, ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर फापाळे, माधवराव तिटमे, अमोल बोराडे, दिलीप नवले, दिलीप मंडलिक, सतीश नवले, संजय भूजबळ, अजीत हासे, संदीप वैद्य यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले. यावेळी भाऊसाहेब वाघचौरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
गद्दार खासदार भाऊसाहेब वाघचौरेंविरुद्ध जन्मभूमीत उद्रेक, अकोल्यात प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलांचा हार घालून जोड्याने मारले, पायाखाली तुडवले pic.twitter.com/k3daJVxOqn
— Saamana Online (@SaamanaOnline) June 19, 2026
ज्याला खासदार करण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान केले. उपाशीपोटी प्रचार केला, त्यानेच कोट्यवधींच्या मलिद्यासाठी गद्दारी केली. मतदारांची फसवणूक करणाऱ्या वाकचौरेला तालुक्यात थारा देणार नाही, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी यांनी दिला. तर हा केवळ एका व्यक्तीविरोधातील निषेध नसून निष्ठावंत शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक आहे, असे तालुकाप्रमुख संतोष मुतडक यांनी म्हटले.
उपजिल्हाप्रमुख प्रभाकर फापाळे यांनी वाकचौरे यांच्यावर जोरदार टीका केली. सत्तेच्या लालसेपोटी पक्षांतर केले. ज्याला नगरसेवकही होता आले नसते, त्याला उद्धव ठाकरे यांनी खासदार केले. गद्दारीचे राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. आता शिवसेना कोणासाठी थांबणार नाही, असा इशारा त्या्ंनी दिला.



























































