
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने 22 मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमानांचे लँडिग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्चपासून आठवडाभर देशभरात एकही आंतरराष्ट्रीय विमान लँड करणार नाही. केंद्र सरकारने एक परिपत्रक काढून याबाबची माहिती दिली आहे.
Government of India: No scheduled international commercial passenger flights shall be allowed to land in India from March 22 for one week. #coronavirus pic.twitter.com/cr7txySAhJ
— ANI (@ANI) March 19, 2020
केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रकात काही नियमावली देखील दिली आहे. केंद्र सरकारने 10 वर्षाखालील व 65 वर्षावरील व्यक्तींना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी असेही या पत्रकात म्हटले आहे. तसेच रेल्वे व विमान प्रवासातील सर्व सूट रद्द करण्याचे आदेशही केंद्र सरकारने दिले आहेत.
हिंदुस्थानात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या वाढत चालली असून आज हा आकडा 167 वर पोहोचला आहे. यात 25 परदेशी नागरिक आहेत. तर दिल्ली, कर्नाटक, पंजाब व महाराष्ट्र या राज्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 9020 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 712 जणांचा मृत्यू हा गेल्या 24 तासात झालेला आहे.

























































