विमानाचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलायन्स एअरच्या विमानाचे इंजिन हवेतच निकामी झाले. विमानाची दुसऱया इंजिनाच्या सहाय्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. या विमानात क्रू मेंबर्ससह 40 जण उपस्थित होते. डीजीसीएने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अलायन्स एअरच्या फ्लाइट क्रमांक 9 आय-698 ने दुपारी 12.33 वाजता प्रयागराजहून नवी दिल्लीसाठी उड्डाण केले होते.