काँग्रेसशी युती करायला तयार मात्र राष्ट्रवादी काँग्रेसशी युती नाही !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नांदेड

देशात भारतीय जनता पक्ष व रा.स्व.संघ धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  २०१९ च्या निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेवर आल्या संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जाईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की दंगली भडकाव्यात म्हणून देशात काही ठिकाणी मशिदी जाळण्यात आल्या, मात्र जनतेच्या संयमामुळे धार्मिक दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न असफल ठरला आहे. आंबेडकर म्हणाले की सोशल मिडीयामुळे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला आहे. केंद्र सरकार सोशल मिडीयावर नियंत्रण आणून एक प्रकारे देशात अघोषित आणीबाणी आणण्याचा  प्रयत्न करीत आहेत. निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की आम्ही काँग्रेससोबत युती करण्यास तयार असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करायला तयार नाही. या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरही टीका केली.