जोरदार ढेकर देण्याचा विक्रम, अमेरिकेच्या किंबर्ली विंटरचे नाव गिनीज बुकमध्ये

जगाच्या कानाकोपऱ्यात इतक्या अजब घटना घडत असतात की, विश्वासच बसत नाही. मात्र अशाच काही अजब गोष्टींचे विक्रम बनतात. असाच एक विक्रम चर्चेत आला आहे. एका महिलेने जोरात ढेकर देण्याचा विश्वविक्रम केला आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका अमेरिकन महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. किंबर्ली विंटर असे या महिलेचे नाव आहे. तिच्या नावावर सगळय़ात जोरात ढेकर देण्याचा विक्रम झाला आहे. तिची ढेकर 107.3 डेसिबल इतकी मोजण्यात आली आहे. याआधी हा रेकॉर्ड इटलीच्या एलिसा कॅगनोनी नावाच्या महिलेवर होता. 2009 मध्ये एलिसाने 107 डेसिबल इतकी जोरात ढेकर दिली होती. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार किंबर्लीची ढेकर हँड ब्लेंडर, इलेक्ट्रिक हॅण्ड ड्रिलर, मोटारसायकलच्या आवाजापेक्षा होती. किंबर्ली विंटरच्या म्हणण्यानुसार तिने कॉफी आणि बियरसोबत नाश्ता करून ढेकर देण्याची तयारी केली होती. तिची ढेकर सर्वात लांब 9 सेकंदाची झाली.