
दासबोधाचे ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्यात श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला असून त्यातील सात जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमित शहांच्या ट्विटर हँडलवर फोटोसह ट्विट करण्यात आले होते त्यावर नाराजी व्यक्त करणारे ट्विट्स येऊ लागले. त्यानंतर काही काळासाठी ही ट्विट गायब झाली. मात्र सोमवारी ती ट्विट पुन्हा दिसू लागली आहेत.

या सोहळ्यानंतर अमित शहा यांनी या कार्यक्रमासाठी झालेल्या अफाट गर्दीचे फोटो शेअर केले होते. मात्र उष्माघातामुळे 10 श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येताच त्यांनी ते ट्विट डिलीट केले. सरकारच्या हलगर्जीपणामुळे लोकांचे मृत्यू झाल्याचा आरोप सध्या होत आहे. त्यामुळे लोकांच्या संतापाचा भडका उडालेला पाहून अमित शहा यांनी त्यांचे ट्विट डिलीट केल्याचे वृत्त येऊ लागले. परंतु सोमवारी पुन्हा ही ट्विट दिसू लागली आहेत.

दरम्यान, अमित शहा यांनी सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास उष्माघातामुळे झालेल्या घटनेप्रकरणी संवेदना व्यक्त केल्या आहेत. मराठीत त्यांनी एक ट्विट केले की, ‘काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे.
मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो’.
काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे.
मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.— Amit Shah (@AmitShah) April 17, 2023

























































