Photo – गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अनन्या पांडे दिसतेय बार्बी डॉल, पाहा फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये इंस्टाग्रामवर खूप सुंदर फोटो शेअर केले असून त्यात ती बार्बी डॉलसारखी दिसत आहे. गुलाबी रंगाच्या या ड्रेसमधील तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या ड्रेसमध्ये अनन्याचे या स्टायलीश लूकसाठी गळ्यात टाय घातला आहे. तिचे लूक पूर्ण करण्यासाठी तिने केसांना बांधले आहे. तर चेहऱ्यावर न्यूड मेकअप केला असून कानामध्ये सिल्व्हर ईअरिंग्स घातले आहेत. इंस्टावर फोटो शेअर करत तिने बार्बी लिहीत बदामाचा इमोजी दिला आहे, अनन्याच्या या फोटोंवर सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सगळ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.