आईच्या स्मरणार्थ बांधतोय 10 कोटींचे मंदिर, आंध्रप्रदेशातील अवलियाची होतेय देशभरात चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज जगभरात मदर्स डे साजरा होत असताना एका अवलियाने अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला आहे. आपल्या आईच्या स्मरणार्थ तिचे कोट्यावधीचे मंदिर उभारत आहे. त्यामुळे सध्या हे मंदीर देशभरात चर्चेचा विषय बनले आहे.

आंध्र प्रदेशातील मंडल चीमावलसा गावातील सनापाल श्रवणकुमारने आई अनुसिया देवीच्या नावाने चक्क एक मंदिर उभारले आहे. या मंदिराचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. अनूसिया मंदिराचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. श्रवण कुमार याच्या आईने त्याच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. त्याला अभ्यासाबाबत कायम प्रोत्साहन दिले. मात्र 2008 साली त्याच्या आईचे निधन झाले. श्रवण जेव्हा शिकून मोठा झाला त्यावेळी त्याने हैद्राबादमध्ये आपला व्यवसाय सुरू केला. आईच्या स्मरणार्थ चीमलवलसा येथे एक मंदिर उभारले. 2019 मध्य़े मंदिराचे काम सुरू होते. या मंदिरासाठी 10 कोटी खर्च येण्याचा अंदाज आहे. यादगिरी गुट्टा श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर उभारण्यासाठी तामिळनाडूचे एक मूर्तिकार बालगम चिरंजीवी,  पंडिदुरई आणि ओडिशाच्या मूर्तिकारांची एक टिमसोबत त्यांनी चर्चा केली. आगमा शास्त्राच्या नियमांनुसार अम्मा देवस्थानमच्या बांधकामाबद्दल त्यांनी सांगितले की, मंदिर उभारणीचे काम त्यांनी याच टीमवर सोपवले.

या मंदिराच्या बांधकामासाठी कृष्ण दगडांचा वापर केला जात आहे. दगडांना जोडण्यासाठी सिमेंटऐवजी प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा वापर केला जात आहे. दगडांचा वापर केल्याने मंदिर मजबूत राहिल आणि मंदिर अनेक दशके तसेच राहिल. मंदजिराचा पाया मजबूत करण्यासाठी श्रावण माता अनुसिया देवीची मूर्ती बसविण्यात येणार असून 51 फूटाची मूर्ती असणार आहे.