
राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस दलात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाच्या माध्यमातून 3 हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सुरक्षा महामंडळ हे ‘सिक्युरिटी गार्ड’ भरण्याचे काम करते. त्यामुळे सिक्युरिटी गार्डला पोलीस खात्यात पंत्राटी पद्धतीने भरती करून त्यांना पोलिसांची जबाबदारी देऊन कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे काढणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणीही केली आहे.
पोलीस भरती निघणार असल्याने अनेक तरुण-तरुणी गेल्या 3 वर्षांपासून तयारी करीत आहे. त्यांना आशा आहे की, आपल्याला शासकीय नोकरी मिळेल. परंतु पोलीस त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे. दुसरीकडे पंत्राटी पद्धतीची सुरुवात ही आघाडी सरकारच्या काळातच सुरू झाली असा दावा फडणवीस यांनी केला.

























































