झकासSSS अनिल कपूर करणार बिग बॉस ओटीटीचे सूत्रसंचालन 

वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रिऑलिटी शो बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीजन येत्या 21 जूनपासून जिओ सिनेमावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसऱया सीजनच्या सूत्रसंचालनाची धुरा करण जोहर किंवा सलमान खान नव्हे तर बॉलीवूडचे झक्कास अभिनेते अनिल कपूर सांभाळणार आहेत. नुकताच ओटीटी वाहिनीने सोशल मीडियावर शोचा नवीन प्रोमो शेअर केला असून त्यात अनिल कपूर यांची झलक पाहायला मिळतेय. दरम्यान, यंदाच्या सीजनमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.