अँटिलिया, जिलेटीनच्या कांडय़ा व मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या खटल्यात माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या जबाबांवर अवलंबून राहणार नाही. एनआयएने विशेष न्यायालयात याबाबतचा अहवाल सादर केला असून एकूण 29 साक्षीदारांचे जबाब तपास यंत्रणेने खटल्यात न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

























































