बापरे! अरिजीत सिंगच्या कॉन्सर्टच्या प्रिमियम लाँजचे तिकीट 16 लाख ?

गायक अरिजीत सिंग हा देशातील आघाडीच्या गायकांपैकी एक. त्याने कायम एका पेक्षा एक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. अरिजीतच्या गाण्यांचे कॉन्सर्ट जगभरात सुरू असतात. या कॉन्सर्टच्या तिकीटाचा स्क्रीनशॉट सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला असून तो पाहून चाहते थक्क झाले आहेत.

अरिजीतच्या कॉन्सर्टच्या प्रिमियम लाँजची तिकीट ही तब्बल 16 लाख रुपये आहे. या कॉन्सर्टची कमीत कमी किंमत ही 999 असून जास्तीत जास्त किंमत थेच 16 लाखापर्यंत आहे. 16 लाखाच्या खालोखाल 14 व 12 लाख, दहा लाख देखील आहेत.

त्या स्क्रिनशॉटवर नेटकऱ्यांनी देखील मजेशीर कमेंट दिल्या आहेत. आमच्या घरी येऊन तो गाणं गाणार आहे का? रडायसाठी 16 लाख कशाला खर्च करायचे? 16 लाखात अरिजीतच्या घराच्या बाजूला छोटंसं घर घेऊ अशा प्रतक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

मात्र प्रत्यक्षात हे 16 लाख एकट्या व्यक्तीचे नसून ते 40 जणांच्या ग्रृपचे आहेत. त्यामुळे प्रत्येकी 40 हजार रुपये भरावे लागतील. त्यात जेवण व अनलिमिटेड अल्कोहोलची देखील सोय आहे.