मलायकाला डेट करण्यावरून ट्रोल करणार्‍या महिलेला अर्जुन कपुरचे प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता अर्जुन कपूर हा सध्या मलायका अरोरा सोबत रीलेशनशीपमध्ये असल्याची जोरदार चर्चा आहे. या मुद्द्याला धरून एका महिलेने अर्जुनला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्जुनने तिला चांगलेच प्रत्युत्तर देऊन तिला गप्प केले.

कुसुम भुटानी या ट्विटर युसर महिलेने अर्जुन कपूरला लक्ष्य करून म्हटले की, “तु तुझ्या वडिलांच्या दुसर्‍या पत्नीचा नेहमीच तिरस्कार केला. या दुसर्‍या पत्नीमुळे तुझ्या वडिलांनी तुझ्या आईला सोडून दिले. आता तु स्वतः तुझ्याहून 11 वर्षापेक्षा मोठ्या स्त्रीला डेट करत आहेस जिला एक तरुण मुलगाही आहे. हा दुटप्पीपणा नाही का असा सवाल तिने केला होता.

यावर अर्जुनने जोरदार प्रत्युत्तर देत म्हटले की, “मी कुणाचाही तिरस्कार केला नाही. आम्ही फक्त योग्य अंतर ठेवले आणि जर मी तिरस्कार केलाच असता तर कठीण काळात जान्हवी, खुशी आणि वडिलांना साथ दिली नसती. तु वरुण धवनची फॅन असून त्याचा फोटो डीपी म्हणून ठेवला आहे.” असे करून तु नकारात्मकता पसरवू नकोस असेही अर्जुन म्हणाला.

 या उत्तरानंतर कुसुमने ते ट्विट डीलीट केले आणि हे माझे वैयक्तिक मत सांगत अर्जुनची माफी मागितली.