
दिलीप जोशी
अभिनेते श्रीकांत मोघे यांची भेट अनपेक्षितपणे झाली. ‘लोकप्रभा’च्या एका दिवाळी अंकात मी ‘पुलं’च्या ‘अंतू बर्वा’ या गाजलेल्या व्यक्तिरेखेविषयी त्याच शैलीत लिहिण्याचा प्रयत्न केला. खरं तर अशा ‘वल्ली’ माझ्या बालपणापासून पाहण्यातल्या होत्या, परिचयातल्या होत्या. ‘पुलं’नी शब्दचित्रात मांडलेल्या ‘अंतू बर्व्या’च्या जवळपास जाणारे आमचे एक नातेवाईकही होते. अनुनासिक उच्चारात ते जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आपलं ‘ठाम’ आणि अंतिम मत मांडत असत… आणि बाकी काहीच करत नसत!
तर मुद्दा असा की, ‘पुलं’ना भेटल्यापासून त्यांच्या ‘अंतू’च्या पारेक्टरने मनात घर केलं. आमच्या भेटीनंतर सात महिन्यांनी पु.ल. गेले आणि एके दिवशी त्यांना ‘ट्रिब्यूट’ म्हणून त्यांच्या ‘अंतू’ला त्यांची आठवण येतेय… तो अजूनही शंभरीच्या घरात आहे अशी कल्पना करून काही लिहिलं. मात्र चार-पाच वर्षे ते कुणाला दाखवण्याची हिंमतच झाली नाही. एकदा काही सिव्हिल इंजिनीयर मित्रांशी गंमत, गप्पा सुरू असताना कुणीतरी म्हणाले, “तुझं काय मत आहे?” मी म्हटलं, मी काही सिव्हिल इंजिनीयर नाही, पण अंतू बर्वाच्या ‘स्टाइल’ने सांगायचं तर “कसले रे तुमचे शिवील इंजिनेरिंग! ज्यात घर बांधताना पाया खणतात, दगड चिणतात, सळया गाडतात. भिंती, दारे-खिडक्या पाडतात. प्लास्टर मारता, पहिली स्लाब टाकली असे म्हणता, कोबा असेल तर चोपला आणि रंग काढला असे म्हणता. ही बांधकामांची भाषा की मोडतोडीची! शिवील कसले, बालपणापासून ज्या व्यक्तीला रंगमंच, चित्रपटाचा पडदा गाजवताना पाहिलं, त्यांच्याशी कधीकाळी ‘मैत्री’ म्हणण्याइतपत गप्पा होतील असं वाटलं नव्हतं. “पुन्हा लवकरच येईन” म्हणालो, पण नाही जमलं. आता ती चुटपुट मनाला कायमची लागलीय. उद्या श्रीकांत मोघे यांची जयंती. त्यानिमित्त हे आठवलं. त्यांनी माझ्या कौतुकाचा लिहिलेला लेख माझ्या ‘संचिता’त आहे! इविल इजेनेरिंग!”… आणि एकच हास्यकल्ळोल झाला. सर्वांनीच ते खेळकरपणे घेतलं, हे तू ‘छाप’ असं म्हणाले. म्हटलं, “नाही, पु.ल. कुठे! आपण कुठे!”
शेवटी ‘लोकप्रभा’चे संपादक टोकेकर यांच्याकडे ते दिलं. त्यांना आवडलं आणि छापून आल्यावर धाकधूक वाटत असताना जगभरातून ‘पु.ल.’प्रेमींचाच प्रतिसाद आला. त्यात पाडगावकरांसारखे कवी, शिरीष कणेकरांसारखे विनोदकारही होते. पुण्यात ते श्रीकांत मोघे यांनी वाचलं आणि मला भेटायला मुंबईला आले. मी जे लिहिलंय ते ‘सादर’ करावं असं त्यांना वाटलं. पुलंच्या ‘वाऱयावरच्या वरातीत’ धमाल काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याला असं वाटलं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. ते ‘लोकप्रभा’च्या आाफिसात आले. डोळे बारीक करत नेहमीच्याच हसऱया चेहऱयाने म्हणाले, “तुम्ही फार गोड लिहिलंय. दीदीनं वाचलं का?”… या दीदी म्हणजे सुनीताबाई. म्हटलं, माहीत नाही. “भाईंची अमर पारेक्टर्स वर्तमानात आणण्याची कल्पना छान आहे. आणखीही आणा.” पुढे मी फक्त ‘… आणि अचानक नंदा प्रधान’ लिहिलं तेवढंच. त्यानंतर आमचा फोनवरचा गप्पांचा सिलसिला सुरू झाला. बालपणापासून ज्या व्यक्तीला रंगमंच, चित्रपटाचा पडदा गाजवताना पाहिलं, त्यांच्याशी कधीकाळी ‘मैत्री’ म्हणण्याइतपत गप्पा होतील असं वाटलं नव्हतं. ‘वाऱयावरची वरात’मध्ये मोघे यांनी रंगवलेला ‘शिरप्या’ आणि त्याचा तो ‘रात चांदनी, मत करो मनमानी… मुझे पिलाहो एक कप कोको’ या तालावर केलेला ‘चा-चा’ डान्स तुफान गाजला. त्यातलेच बोरावके मास्तर आणि कानडी कडवेकर या व्यक्तिरेखांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांनी अनुभवले. “अहो, भाईंकडे ते कौशल्य होतं. कुणाकडून कुठलं पारेक्टर करून घ्यायचं हे त्यांना आधी दिसायचं.”
एकदा पुलंच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाविषयी बोलताना मोघे बराच वेळ भारावून बोलत राहिले. “…गायक, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, वक्ता… काय… काय… भूमिका केल्या त्यांनी आयुष्यात! त्यांच्यामुळे अनेकांचं कलाजीवन समृद्ध झालं…” बोलता बोलता त्यांचा स्वर गहिवरला होता. मी जवळपास तासभर तितकंच भारावून ऐकत होतो. कधीतरी फोन यायचा “अहो, पत्ता काय? फोन लागत नाहीये तुमचा. बाकी तुम्ही कामाची माणसं… आमचा शंतनुही उत्तम अभिनेता झालाय… हो, विसरण्याआधी सांगतो, आपण एक पत्रक काढू या आणि हे चानलवर अनेकदा हिंदी छापाचं मराठी बोललं जातं, त्याविषयी त्यात सुधारणा सुचवू या.” म्हटलं, “दादा, तुमचं नाव पुरेसं आहे. आम्हाला कोण ओळखतो?” ते म्हणाले, “व्वा… असं कसं… तुम्ही पत्रकार म्हणजे सर्वव्यापी!”… आणि खळाळून हसले. “असं करा… पुण्याला या… मला आधी कळवून या. भरपूर बोलू आणि काय ते ठरवू.”
दिवस, वेळ ठरली. पुण्याला गेलो, पण अचानक कामामुळे त्यांना बाहेर जावं लागलं. भेट हुकली. परतीच्या ट्रेनमध्ये बसताच पुण्याच्या मित्राचा फोन आला, “अरे, आत्ताच मोघ्यांचा फोन आला. तुमची भेट झाली नाही, त्याची त्यांना खूप हळहळ वाटतेय.” मी लगेच फोन केला, “पुन्हा लवकरच येईन” म्हणालो, पण नाही जमलं. आता ती चुटपुट मनाला कायमची लागलीय. उद्या श्रीकांत मोघे यांची जयंती. त्यांनी माझ्या कौतुकाचा लिहिलेला लेख माझ्या ‘संचिता’त आहे!





























































