आरोग्य : दुखापत व मानसिक आरोग्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. पृथ्वीराज देशमुख

बऱ्याचदा क्रीडापटूंची खेळाचा भाग म्हणून दुखापती स्वीकारतात. हे अपरिहार्य असले तरी जेव्हा एखाद्या खेळाडूला दुखापत होते, तेव्हा त्यांच्या शरीरासह मनावरही आघात होतो. अनेकदा शरीरावरील जखमा दिसून येतात, परंतु मनावरील घाव पटकन लक्षात येत नाहीत. त्यामुळे खेळाडूंना होणा ऱ्या शारीरिक दुखापतींसह त्यांच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

मैदानी खेळांमध्ये दुखापत झाल्यानंतर क्रीडापटूंची मोठय़ा प्रमाणात शारीरिक हानी होण्याची शक्यता अधिक असते. अशा खेळाडूंसाठी नेक्सस डे केअर सेंटरने एक नवीन पद्धत आणली आहे. यामुळे नव्या क्रीडापटूंचींना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करताना दुखापतींचा अडसर त्रासदायक ठरणार नाही. उपचार व त्याचे परिणाम यातून असे दिसून आले की, 70 टक्के सहभागींनी त्यांच्या पूर्व इलाजांवर उपचार पुन्हा सुरू केले आहेत.

खेळांमधल्या दुखापतीला मनोवैज्ञानिक बाजू आहे आणि ती एक महत्त्वपूर्ण तसेच जोखीम घटक म्हणून ओळखली जाते. दुर्लक्ष झाले तर मानसिक आजाराचा धोका वाढतो. दुखापतीनंतर नकारात्मक भावना, मनस्थिती बिघडणे, पुन्हा दुखापत होण्याची भीती, अपयशावर आधारित नैराश्य, नाश, आत्मविश्वास कमी होणे आणि अस्वस्थता जाणवू शकते. जेव्हा खेळाडूंना सुरुवातीला दुखापत होते तेव्हा ते दुःख, नकार, राग, निराशा आणि नैराश्याच्या नकारात्मक भावनांना बळी पडू शकतात. जर खेळाडूंनी या भावनिक आव्हानांचे निराकरण केले नाही, वेळीच उपचार घेतले नाहीत तर मानसिक आरोग्यावर गंभीर व विपरीत परिणाम होऊ शकतात.

ज्या मुलांना खेळामध्ये करीअर करायचे आहे, त्यांना गंभीर दुखापतींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. इतकंच नाही तर खेळाच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच भविष्यात त्यांना चिंता, नैराश्य आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर यांसारख्या मानसिक आजाराशी सामना करावा लागू शकतो. अशा स्थितीत शारीरिक दुखापती टाळण्यासाठी क्रीडापटूंचींनी सावधगिरी बाळगत योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.

बऱ्याचदा शस्त्रािढयेनंतर काही खेळाडू पूर्वीसारखे खेळू शकत नाहीत. अशामुळे अनेक खेळाडूंना नैराश्याचा सामना करावा लागतो. ‘इंटर्नल ब्रेस टेक्नॉलॉजी’ हे एक अलीकडचे तंत्र आहे, जे फाटलेल्या घोटय़ाच्या अस्थिबंधांना प्रभावीपणे हाताळू शकते. नवीन अस्थिबंधन बांधण्याऐवजी या पद्धतीमध्ये हाडांमधील दोन बायो कंपोझिट किंवा पीईईके अँकर, त्यांच्या दरम्यान ठेवलेल्या फायबर टेपसह खराब झालेले अस्थिबंधन दुरुस्त करण्यात येते. या नावीन्यपूर्ण पद्धतीमुळे क्रीडापटूंचींसाठी मजबूत स्नायुबंधांची दुरुस्ती झाली आहे. या शस्त्रािढयेमुळे खेळाडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होऊ शकतात.

‘नेक्सस डे सर्जरी सेंटर’मध्ये मस्क्युकोस्केलेटल आजार ओळखण्यासाठी, बरे करण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी एक सहयोगी आणि व्यापक पद्धत वापरली जाते. जीवनशैलीतील बदल, फिजिओथेरपी आणि इतर तंत्रांवर भर देऊन रुग्णांसाठी वैयक्तीकृत थेरपी प्रोग्राम तयार करण्यासाठी तज्ञांचा एक गट सहयोग करतो. रुग्णाची सामान्य शारीरिक क्षमता वाढवणे, मोठी शस्त्रािढया न करता त्यांचा खेळ पुन्हा सुरू करणे हा यामागचा उद्देश आहे.

(लेखक नेक्सस डे सर्जरी सेंटर येथे ऑर्थोपेडिक सर्जन व इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंट स्पेशलिस्ट आहेत)