दीपशिखा – समंजस आणि सात्त्विक पुतळाबाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयश्री संगीतराव

मराठी साम्राज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य हाच त्यांचा परिवार असला तरी या महान विभूतीच्या आयुष्यातील इतर व्यक्तीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. अशीच एक व्यक्ती म्हणजे तिसऱया राणी सरकार पुतळाबाई, ज्या शिर्के घराण्यातल्या नावाप्रमाणेच सौंदर्य, समंजसपणा समोरच्याला जीव लावणाऱया अशा होत्या. त्यांच्या नावातच सोज्वळ सौंदर्याचं प्रतिबिंब होतं.

शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे वागणे, शिवरायांचे सलगी देणे कैसी’ असे रामदास स्वामींच्या या श्लोकातील शब्द मनात येताच ‘शिवचरित्र’ डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाही. अर्थातच ते मराठी साम्राज्याचे जनक छत्रपती असले तरी त्यांनाही त्यांचा परिवार होताच. इतक्या महान विभूतीच्या आयुष्यात येणाऱया इतर व्यक्तीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव त्यांच्या आऊसाहेब म्हणजेच जिजाबाईंचा होता, पण पत्नी म्हणून त्यांच्या आयुष्याशी बांधल्या गेलेल्या त्यांच्या सहधर्मचारिणीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

शिवाजी महाराजांनी एकूण सात विवाह केले. पहिल्या पत्नी सईबाईची साथ त्यांना फारच कमी मिळाली. त्यांच्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. दुसऱया सोयराबाई, ज्यांना राजसत्ता, महाराणी पदाचे अधिकार, राज्यकारभार आणि सत्तालालसा होती. तिसऱया पुतळाबाई, ज्या शिर्के घराण्यातल्या नावाप्रमाणेच सुंदर, समंजसपणा समोरच्याला जीव लावणाऱया अशा होत्या. खरं तर त्यांच्या नावातच सोज्वळ सौंदर्याचं प्रतिबिंब होतं. अर्थातच प्रतिबिंब म्हणजे जे आहे त्याची पडछाया किंवा प्रतिकृती दिसणं. पुतळा हे नाव घेताच हे मनात आल्याखेरीज राहत नाही. बरोबर आहे आणि पुतळा म्हणजे एखाद्या सौंदर्याची किंवा अंगी असलेल्या अलौकिक गुण धारण केलेली आकृती, हो ना ?
‘पुतळा’ हा शब्द उच्चारताच आणखी एक शब्द आठवतो तो म्हणजे पुतळी! सर्व स्त्राrसुलभ गुणसंपन्नतेची पुतळी म्हणजेच पुतळाबाई. सईबाईनंतर जर महाराजांना जवळची कोणी भार्या असेल तर त्या याच. सवती मत्सर या

स्त्राrसुलभ स्वभावाची सावलीलाही त्यांच्या समोर उभं राहण्याची हिंमत नसावी. कारण त्याशिवाय मातृसुख हरवलेल्या शंभू बाळांच्या त्या छोटय़ा मांसाहेब बनू शकल्याच नसत्या. महाराजांना भावनात्मक पाठबळ जर कुणाचं असेल तर ते पुतळा राणीचं. त्यांच्या पोटी अपत्य नव्हते, पण ही उणीव शंभूराजांना माया देऊन त्यांनी पूर्ण केली. अर्थातच त्यासाठी त्यांना अनेकदा अपमानितही व्हावं लागलं, पण तरीही त्यांच्या वागण्यात कधीच फरक पडला नाही. शिवरायांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानीच नाही, तर राजा म्हणून जे जे गुण असायला हवेत अशा आदर्श राजाची सहधर्मचारिणी कशी असावी याचं उत्तर म्हणजे पुतळाबाई.
स्वगत

“थोरल्या बाईसाहेब, नका हो असं घालून पाडून बोलू शंभूराजांना. इतके का मोठे आहेत ते? झाली असेल चूक. तरुण वय, आपणच समजून घ्यायला हवं ना… आणि बाळराजांकडे लक्ष द्यायलाच हवं, पण म्हणून शंभूराजांना दूर लोटून कसं चालेल?” तशा थोरल्या राणी गरजल्या, “धाकटय़ा राणीसाहेब, ध्यानात कसं येत नाही तुमच्या? अहो, पुत्राचे गुणदोष दिसायला माय व्हावं लागतं माय. तुमची कूस कुठे उजवली? नऊ महिने उदरात भार सोसावा लागतो. पाऊल जडावे लागते, तड लागावी लागते पोटाला. थोडीथोडकी नाही, चांगले नऊ महिने. अहो, एवढय़ावरच थांबत नाही, तर मूल जन्माला घालताना कळा सोसाव्या लागतात, पण त्यासाठी कपाळावर भाग्य लिहून यावं लागतं लेकुरवाळीचं. तुमच्यासारख्या कपाळकरंटय़ांना कसं कळणार ते?”

थोरल्या बाईसाहेबांचे हे शब्द उकळत्या शिशाचा रस कानात ओतावा तसे वाटले आम्हांस. ‘कपाळकरंटय़ा’ या शब्दाने तर हृदयाच्या चिंध्या चिंध्या झाल्या, मन आाढाsश करू लागले, विचारू लागले, खरंच का आम्ही अभागी अन् क्षणात सई बाईसाहेबांचा चेहरा डोळ्यांसमोर आला. तीन कन्यांच्या पाठी पुत्रलाभ तर झाला, पण त्यातच त्यांना बाळंतरोगाने गाठलं. देव, दुवा झाल्या, दवाही झाल्या, पण उतार होईना. साऱयांना समोरचं भयाण सत्य दिसत होतं. त्यांनीही ते स्वीकारलं होतं. एकदा आम्ही त्यांच्या महाली गेलो तेव्हा बाईंनी आमचा हात हाती घेतला आणि म्हणाल्या, पुतळाबाई, आता आमचं आयुष्य म्हणजे औटघटकेचं राज्य ! यापुढे बाळराजांना आम्ही तुमच्या ओटीत घातले. त्याच वेळी दोन-सवादोन वर्षांच्या शंभू बाळाने मागून येऊन आमच्या गळ्यात हाताची मिठी घातली, गालावर गाल घासू लागले. त्याच क्षणी आम्हाला वाटलं, आमचा पदर भिजतोय. थोरल्या बाईसाहेब म्हणतात तसं आम्हांस नसेल फुटला पान्हा, पण हृदयातली माय मात्र जागली. आम्ही त्यांना हृदयाशी कवटाळलं. तसं सई बाईसाहेबांच्या मुखावर आम्हाला समाधानाचे हास्य दिसले. त्यांची वेदना जरा कमी झालेली भासली. मनात आलं, वेद वाचणं सोपं असतं, पण वेदना वाचता यायला हवी. ती आमच्या मायेने वाचली आणि वेचून ओंजळीत झेलली अन् पेललीसुद्धा.

बाईंचं दुखणं बळावतच होतं. महाराज मोहिमेवर निघाले त्या वेळी त्यांच्या हातावर दहीसाखर घालण्याची जबाबदारी त्यांनी आमच्यावर सोपवली. त्यांची नजर जणू सांगत होती, शंभू बाळालाच नाही, तर महाराजांनादेखील आम्ही तुमच्या स्वाधीन करतोय. त्याच क्षणी जाणवलं, पत्नी क्षणाची पत्नी, पण अनंत काळाची माता असते हे काही खोटं नाही. शंभू बाळ दिसामासाने वाढत होते, पण त्यांच्या बारशाच्या वेळी हरभटांनी सांगितलेले त्यांचे भविष्य मात्र मन कातर करत होते. अजूनही बारशाचा तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. ‘कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या’ करत बारशाच्या विधीला सुरुवात झाली. “बाळराजांचे नाव आम्ही ठेवणार”…मांसाहेबांच्या शब्दांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पुतळा राणी आम्ही तुमच्या कानात सांगतो, असं म्हणताच आम्ही कान त्यांच्या जवळ नेला. क्षणात आमचं मन हरखून गेलं. बाळराजे आता त्यांच्या दिवंगत थोरल्या काकासाहेबांच्या नावाने ओळखले जाणार. सगळ्यांनाच आनंद झाला. ‘शंभूराजे’ नकळत पुतळाच्या मुखावाटे शब्द बाहेर आले.

सगळे विधी यथासांग पार पडले. बाळराजांची कुंडली करायला हरभटांनी गणित मांडले… साक्षात रुद्रावतार जन्माला आलाय. कुलाची कीर्ती उंच करेल. रुद्रासारखा शौर्याचा प्रलय करेल. तसाच भोळा सांब, साधासरळ असेल. साऱयांचे चेहरे आनंदाने, कौतुकाने फुलले. नंतर मात्र साऱयांनी कान टवकारले. आपलं उपरणे सावरत गुरुजी बोलले, “सारं ठीक आहे हो! पण बाळराजांना आप्त स्वकीयांकडून धोका होण्याची संभावना आहे. आमचं मन आतल्या आत कळवळलं. साऱयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. महाराजांच्या चेहऱयावर क्षणभर काळजीचे मेघ दाटले, पण पुढच्याच क्षणाला महाराज बोलले, “रुद्राचे सारे गुण घेऊन आलेत म्हणालात ना, मग विष पचवण्याची ताकदही त्यांच्या अंगी असणार.” सगळ्यांच्या मनावरचा भार हलका झाला. महाराजांच्या बाळलीलांनी आमच्यातली आई सुखावत होती, पण सई बाईसाहेब गेल्यानंतर इवल्याशा बाळाचं केलेलं मुंडण बघून
मन कळवळलं
(क्रमश:)
 [email protected]