
>> शिल्पा सुर्वे
चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरचा झगमगाट म्हणजे ’चार दिन की चाँदनी’ असते. तिथे जोपर्यंत तुमचं नाणं चालतं, तिथपर्यंत तुम्ही प्रकाशझोतात असता. एकदा का तुमची जागा दुसऱयाने घेतली की तुमची गणना गतकाळात होऊन जाते. ही झाली पडद्यावर दिसणाऱया चमकत्या सिताऱयांची गोष्ट. पॅमेऱयामागे काम करणाऱया कलावंतांबद्दल तर विचारायला नको. मोठय़ा सिनेमाच्या यशात पडद्यामागील कलावंतांचा मोठा हात असतो. पण त्याचे श्रेय त्यांच्या वाटय़ाला येत नाही. कला दिग्दर्शक लीलाधर सावंत हेदेखील अशाच क्षेत्रातील. पण आपल्या मेहनतीच्या, प्रयोगशीलतेच्या जोरावर लीलाधर सावंत यांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची छाप सोडली.
सिनेमाला वास्तववादी करण्याचे काम कला दिग्दर्शक करत असतो. लीलाधर सावंत यांनी या क्षेत्राला आपले आयुष्य वाहिले. सावंत मूळचे सिंधुदुर्गचे. बीएफए झाल्यानंतर त्यांनी सैन्यदलात नोकरी केली. त्यानंतर मुंबईतील एका पंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम केले. त्यांना चित्रकलेची आवड होती. कलेच्या आवडीतून त्यांनी नोकरी सोडून तुटपुंज्या मानधनावर चित्रपटांची पोस्टर रंगवण्याचे काम सुरू केले. यातून ’बेताब’ चित्रपटाची हवेली बनवण्याचे काम त्यांना मिळाले. त्याच वेळी इप्टा नाटय़संस्थेचे सेटदेखील ते बनवून देत. या तीन वर्षांच्या काळात त्यांनी सहायक कला दिग्दर्शक म्हणून सुमारे 400 हिंदी चित्रपटांसाठी काम केले. पुढे मुख्य कला दिग्दर्शक म्हणून ’बॉक्सर’ हा त्यांना पहिला चित्रपट मिळाला. सावंत यांना स्वतंत्रपणे आपले काwशल्य दाखवण्याची संधी मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. त्यानंतर सावंतांनी मागे वळून पाहिले नाही. 25 वर्षे या क्षेत्राची सेवा केली. ’हत्या’, ’100 डेज’, ’दीवाना’, ’जिद’, ’मै खिलाजी तू अनाडी’, ’जुल्मी’, ’हद कर दी आपने’, ’अनाडी नंबर 1’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. अशा सुमारे 170 सिनेमांसाठी कला दिग्दर्शन केले. चार हॉलीवूड सिनेमांचेही कला दिग्दर्शन केले. 1988 सालच्या ’हत्या’ चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
एकीकडे हिंदी सिनेसृष्टीत सावंत यांची कारकीर्द उंचावत होती. अनेक चित्रपटांना त्यांचे कलात्मक होत लागत होते. पुरस्कारांवर त्यांच्या नावाची मोहोर उमटत होती. त्याच वेळी हा झगमगाट सोडून ते इंडस्ट्रीपासून दूर गेले. विशाल सावंत हा त्यांचा मुलगा वयाच्या 14 व्या वर्षी हे जग सोडून गेला. सावंत यांच्या मुलाचा कर्परोगाने मृत्यू झाला. हे दुःख सावंत दांपत्य सहन करू शकले नाही. त्यांनी चंदेरी दुनियेला रामराम ठोपून वाशिम जिह्यातील जऊळका गाव गाठले. जिवंत आणि देखणे सेट उभारणाऱया कलावंताचे हात गावातील काळ्या मातीत राबू लागले. तेच त्यांचे जीवन बनले.
जुलै 2021 मध्ये सावंत यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आणि बॉलीवूडपासून दूर गेलेले सावंत पुन्हा चर्चेत आले. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलादिग्दर्शकावर लोकांकडे मदतीची याचना करण्याची वेळ आली. घरातील भाडेकरू देत असलेल्या भाडय़ावर सावंत गुजराण करायचे. त्यांच्या दोन बायपास झाल्या होत्या. ब्रेन हॅमरेजही झाले होते. त्यांची प्रपृती खालावली होती. पतीच्या उपचारात आयुष्यभराची जमा पुंजी खर्च झाल्याचे त्यांच्या पत्नी पुष्षा यांनी सांगितले. ज्या लोकांनी सावंत यांच्यासोबत इंडस्ट्रीत काम केले, त्यांनी मदत करावी, अशी अपेक्षा पुष्पा यांनी व्यक्त केली. त्यानंतर सावंत यांच्या मदतीला काही हात सरसावले.
21 ऑक्टोबर 2021 रोजी वयाच्या 70 व्या वर्षी सावंत यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मराठमोळा प्रतिभावंत कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. कोणताही गॉडफादर नसताना त्यांनी इंडस्ट्रीत पाय रोवले होते. स्वतःच्या मेहनतीवर पुरस्कारांवर नाव कोरले. याच पुरस्कारांनी त्यांचे घर भरले. आयुष्याच्या उतारवयात या पुरस्कारांवरची धूळ झटकण्याचे काम ते करायचे. कारण तीच त्यांची कमाई होती. ग्लॅमरस दुनियेची ही दुसरी बाजू होती.






























































