
<< वरद चव्हाण
आरती मोये. तळवलकर्समुळे घरात अभिनयासोबत व्यायामशाळेचेच वातावरण. आता आरती खास स्त्रियांसाठी फिटनेस प्रोग्रॅम्स अमलात आणते.
नमस्कार फिटनेस फ्रिक्स! फिटनेसचा खरा अर्थ काय असतो? काय वाटतं तुम्हाला? नुसते सिक्स पॅक ऍब्स दिसणं म्हणजेच फिटनेसची व्याख्या नाही. तुमची मानसिकता किती सक्षम आहे यावरसुद्धा तुमचा फिटनेस अवलंबून असतो. खरं सांगू का तर मानसिक पातळीवर (मेंटली) स्त्र्ाया पुरुषांपेक्षा खूप स्ट्राँग असतात. शारीरिक बळ जरी पुरुषांकडे स्त्र्ायांपेक्षा जास्त असले तरीही आपल्या आयुष्यात येणाऱया कठीण काळाला सामोऱया ज्या स्त्र्ाया खंबीरपणे समोर जातात तितके पुरुष नाही जाऊ शकत. आज आपण अशाच एका स्त्र्ााrबद्दल वाचणार आहोत. जिने प्रत्येक स्त्र्ााrला तिला सामोरे जाणाऱया समस्यांपासून बाहेर काढून स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले. मग ती समस्या सामाजिक असो, मानसिक असो किंवा शारीरिक असो. आज आरती तळवलकर-मोये त्यांच्या ठाणे येथील ‘कॅनव्हास फॉर हर’ नावाच्या फिटनेस सेंटरमधून हे काम करीत आहेत. हे हेल्थ क्लब फक्त आणि फक्त स्त्र्ायांसाठीच आहे. या क्लबमध्ये अनेक गृहिणी नुसतं शारीरिकदृष्टय़ा फिट होत नाहीत तर बऱयाच वेळा संसाराचं ओझं वाहून किंवा एक स्त्र्ााr म्हणून समाजात ज्या समस्यांना सामोरं जाऊन एक सेल्फ कॉन्फिडन्स जो कमी झाला असतो तो परत आणण्याचा काम आरती मोये ‘कॅन्व्हास फॉर हर’ नावाच्या हेल्थ क्लबच्या माध्यमातून करत आहेत. या हेल्थ क्लबमध्ये स्त्र्ायांच्या फिजिकल फिटनेससाठी झुला, योगा, क्रोसफिटस् यासारखे व्यायामाचे प्रकार असतात. दर दिवशी एक प्रोग्रॅम डिझाईन करण्यात येतो. याशिवाय जर कुठल्या स्त्र्ााrला एखाद्या पर्सनल ट्रेनरची गरज असेल तर ती ही सुविधा उपलब्ध असते. त्या हेल्थ क्लबचे मेन टार्गेट आहे. नोकरी करणारा स्त्र्ााr वर्ग किंवा नुकत्याच आई झालेल्या स्त्र्ाया, नोकरी करणाऱया स्त्र्ाया यासाठी कारण आज नोकरीत जी स्ट्रेस लेव्हल असते, कामाच्या डेडलाइन्स असतात ते प्रत्येकाला हॅण्डल करता येतंच असं नाही. आणि नुकत्याच आई झालेल्या स्त्र्ाया यासाठी कारण एकतर त्यांना त्यांच वजन कमी करायचं असतंच आणि दुसरे कारण म्हणजे अनेक स्त्र्ायांना हे माहितीसुद्धा नसते की प्रेग्नन्सीनंतर बऱयाच वेळा स्त्र्ायांना पोस्ट नॅटल डिप्रेशनला सामोरे जावे लागतं. आणि म्हणूनच या हेल्थ क्लबमध्ये Psyctratrist, Gynecologist, Dermatologist, Dietician ची सोय सुद्धा करण्यात आली आहे. बराच स्त्र्ााr वर्ग घरी लहान बाळ असल्यामुळे त्यांना घरी एकटं सोडून कुठेही बाहेर पडू शकत नाहीत. या लहान मुलांसाठी किडस् प्ले एरियाचीसुद्धा व्यवस्था आहे. थोडक्यात काय तर आजवर मी लिहिलेल्या लेखांपेक्षा हा लेख नक्कीच वेगळा आहे. आजवर आपण विविध सेलिब्रिटीज किंवा क्रीडापटूंचे लेख वाचले. त्या लेखामध्ये कोण किती व्यायाम करीत किंवा खात यावरच लिहिल्या गेले होते. तुम्हाला ते वाचून आवडतही असेल, पण सुरुवात कुठून आणि कशी करावी ते कळत नसेल आणि स्त्र्ायांना खरंच आपण एवढा व्यायाम करायची किंवा काटेकोरपणे आहार पाळायची गरज आहे का, असं निश्चितच वाटत असेल, पण आरती मोये ती पुढाकार घेऊन जे पाऊल उचलले आहे. त्यामुळे स्त्र्ााr वर्गाचा व्यायामाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल यात शंका नाही.
























































