मुखवटे सोलताना : अनंत अमुती ध्येयाासक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मल्लिका अमर ळेख

ध्येय गाठणारे कोलंबससारखे वेडे महान लोक! माणसानं थोडं तरी वेडं असावं लागतंच. कारण ध्येय तुम्हाला शोधत येत नाही. तुम्ही ध्येयापाठीमागे वेडं होऊन धावावं लागतं. ध्येय असणं महत्त्वाचं. तुमच्या असण्याचा तो अर्थ असतो, जे तुम्ही जबाबदारीनं सजगपणे जगता. ध्येय नसणं म्हणजे तुम्ही एक निरर्थ शून्य असणं. ‘ध्येय’ हा शब्द खूप जड, गहन वाटतो, पण आपल्या कच्च्याबच्च्यांना जगवण्यासाठी घामाघूम होऊन परतणारा, मुलांच्या शिक्षणासाठी हाडाची काडे करणारा बाप, मजूर, चाकरमानी, पण ध्येयवादीच असतो. मुलांसाठी जागरण करणारी, सतत मायेची पाखर घालणारी मायही तेवढीच ध्येयासक्तच की!


अनंत अमुची ध्येयासक्ती…
‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा…
किनारा तुला पामराला!’

कुसुमाग्रजांचे हे अक्षय अमृत चिंरजिवी शब्द!
ध्येय गाठणारे कोलंबससारखे वेडे महान लोक! माणसानं थोडं तरी वेडं असावं लागतंच. कारण ध्येय तुम्हाला शोधत येत नाही. तुम्ही ध्येयापाठीमागे वेडं होऊन धावावं लागतं. काही यशस्वी होतात, काही नाही. माझं स्वतःचं असं आवडतं तत्त्वज्ञान आहे की, हरलात की जिंकलात ते महत्त्वाचं नाही. लढलात हे महत्त्वाचं, ध्येय असणं महत्त्वाचं. तुमच्या असण्याचा तो अर्थ असतो, जे तुम्ही जबाबदारीनं सजगपणे जगता. ध्येय नसणं म्हणजे तुम्ही एक निरर्थ शून्य असणं. ‘ध्येय’ हा शब्द खूप जड, गहन वाटतो, पण देशभक्ती, वैज्ञानिक शोध, अंतराळ, रसायन पिंवा खेळातली, कलेतली टोकाची ध्येयासक्ती म्हणजेच ध्येय नव्हे, आपल्या कच्च्याबच्च्यांना जगवण्यासाठी 9.30च्या तुफान गर्दीत जीवाच्या कराराने घुसणारा, घामाघूम होऊन परतणारा, मुलांच्या शिक्षणासाठी हाडाची काडे करणारा बाप, मजूर, चाकरमानी, पण ध्येयवादीच असतो.

मुलांसाठी जागरण करणारी, सतत मायेची पाखर घालणारी मायही तेवढीच ध्येयासक्तच की! समाजासाठी त्याग करणारे जेवढे थोर, त्याबरोबरीनं त्या त्यागमूर्तीसाठी त्याचं जीवन सुकर, सुखी करायला धडपडणारी माणसंसुद्धा मोठीच की!
स्वातंत्र्यवीर सावरकर, गांधीजी, टिळक, भगतसिंग, उधमसिंग, चापेकर बंधू, राजगुरू, सुखदेव ही महान माणसं. त्यांचा महान त्याग, बलिदान आठवताना आपण आठवतो का त्यांच्या पाठीमागे जगणाऱया, कष्टणाऱया त्यांच्या बायका ? आई, बहीण, पत्नी, मुलं ? दुसऱयाला जगवण्याचा प्रयत्न करणं हे ध्येय छोटं नाही बरं! ही पडद्याआडची माणसं पायाचा दगड होतात म्हणून तर तेजोमंदिर उभं राहतं!

आजच्या मुलांकडे पहा. अमुक अमुक मोबाईल हातात असणं त्यांचं ध्येय असतं, तर कुणाचं ध्येय अमेरिकेत जाऊन सेटल होणं असतं. कुणी टय़ुबलाईटच्या काचा खात, कुणी उलट चालण्याचा पराक्रम करतं!

या विकासाच्या तुफान वेगात आम्ही आमची ऊर्जा, आमची ध्येयासक्ती हे हरवत चाललोय की काय? हा प्रश्न पडतो. खरं तर विकास, प्रगती वाढली की, माणसांचे प्रश्न कमी कमी व्हायला पाहिजेत, पण असं होताना दिसत नाही. एकटेपणाचा कल्लोळ वाढलाय, नैराश्याच्या अंधारकोठडय़ा उंच उंच होतायत, जन्मलेली नवनवी यंत्रं माणसांना खाऊ लागलीयत, सुधारीत तंत्रज्ञान मेंदू कुरतडू लागलेयत. ग्लोबलायझेशनच्या श्रीमंती धुरात गरीबाची चूल विझू लागली. निर्मिकाचे वरदान घेऊन आलेले कवी-लेखक-प्रकाशक यांच्या असण्याचे काwतुक नाही, नसण्याची खंत वाटेनाशी झाली. नव्या शोधांबरोबर नव्या विकृतीही जन्माला आल्या. फसवणुकीच्या लुटीचे अनंत मार्ग शोधणारे नवे शर्विलक निर्माण झाले, मातृत्वाचे नवे मार्ग सापडले, पण माणूस होण्याचा नेमका अर्थ शोधणारा कोलंबस निर्माण झाला नाही. एकमेकांना पाण्यात पाहणारी व कायम एक डोळा अण्वस्त्रांवर ठेवून एक बोट दहशतीच्या चापावर ठेवणारी राष्ट्रं…यांचं ध्येय काय तर सत्ता, वर्चस्व वाढवणं. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद… सगळय़ाचा अवलंब करणं. पूर्वी लोकशाहीची व्याख्या होती… ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य’. आता असं नाही. जगभरात आता ‘माझ्यासाठी चाललेले माझे राज्य’ असा आहे. कोरिया, अमेरिका, रशिया, पाकिस्तान, चीन…बारकाईनं वेगळय़ा अँगलने पाहिलं तर शासन व प्रजा आणि नवरा व बायको यांचे संबंध मालक आणि नोकर असे झालेले आहेत.

सर्वजण सुविधा असतानाही एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. उखाळय़ापाखाळय़ा फक्त बायकाच काढतात असं नाही. ‘नळावरची भांडणे’ असे नाव देऊ या पद्धतीने सर्व चालते. यात ध्येय, तत्त्व, मूल्य, मानव्याप्रति निष्ठा हे स्टॉप वा हे रस्ते येतच नाहीत.

त्या मानानं मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग, मजूर वर्ग आपापली कर्तव्यं चोख पार पाडत कुटुंबप्रमुखाचे ध्येय अंगिकारताना दिसतात हेही नसे थोडके. सहजसोपं, साधं जगणं खूप कठीण असतं. निसर्गानं पक्ष्याला फक्त एक छोटी चोच न् पंख दिलेत, पण रोज हजारो फेऱया मारून काडी काडी आणून पिलांच्या सुरक्षित निवाऱयासाठी घरटं बांधण्याचं ध्येय तो उत्कृष्टपणे निभावतो न् आपल्याला अद्भुत बुद्धी, इतके अवयव, दहा बोटं इतकी श्रीमंती दिली असून आपण पहिल्या पहिल्यांदा निसर्गाला खुश करायला खूप शोध, सुधारणा ध्येयंबियं केली. नंतर ‘‘आता बास झाले रे, आता आपण अण्वस्त्र्ा, नवे जंतू शोधून याला मारू त्याला मारू. आता हा ग्रह पुरेसा विद्रूप केलाय. आता ध्येयबियं बंद’’ असाच पण केलेला दिसतोय. काही अपवाद वगळता ध्येयाच्या वाटेवर वळणारे कमीच. कारण काटे जास्त! ‘आत्मा’रामाला जास्त त्रास देणं आताशा कुणाला आवडत नाही असंही!
– [email protected]