
द्वारकानाथ संझगिरी
हिंदुस्थान-पाकिस्तान मॅच हे धर्मयुद्ध आहे का? हिंदुस्थान जिंकल्यावर कश्मीरच्या जखमांनी होणाऱया घातपातांच्या जखमांवर फुंकर घालण्याची आपली भावना होते ना? इतर विजयापेक्षा गुदगुल्या जास्त होतात हे नक्की! पण हा विषय अनेकदा चघळला गेलाय. त्याला ओलांडून आपण या मॅचकडे पाहूया.
माझ्या मते वर्ल्डकप ही शोकेस असेल तर अंतिम सामन्याचा अपवाद वगळता हिंदुस्थान-पाकिस्तान सामना हा शोकेसमधला सर्वोत्कृष्ट शोपीस आहे. आयसीसी पूर्ण विचाराने तो कुठे घ्यावा हे ठरवते. या सामन्याच्या पंचवीस हजार तिकिटांसाठी पाच लाख लोकांनी अर्ज केले. मुख्य म्हणजे, काही तासांत छबिलदाससमोरचा वडा संपावा तशी ती संपली मॅचच्या आदल्या दिवशी. आकाशात ढग असताना, पाऊस उंबरठय़ावर येऊन उभा असल्याची भीती असताना तिकिटांचा काळाबाजारात भाव 500 पौंड (45,000) रुपये आहे. गोल्ड कार्ड वगैरेंची किंमत सोन्याच्या पाच ग्रॅमच्या नाण्याइतकी असू शकते. ब्रॉडकास्टर्स या मॅचसाठी जाहिरातीचे दर पन्नास टक्क्यांनी वाढवतात. इन्शुरन्स कंपन्या देवाला साकडे घालतायत. ओ जिजस, पाऊस थांबव. पावसाने त्यांना आधीच तीनशे कोटींच्या गाळात घातलंय. या सामन्याचा विमा नक्कीच मोठा असणार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रेक्षकांत फक्त निळाई दिसणार नाही, हिरवा रंगही डोळय़ांत भरेल. ‘गणपती बाप्पा मोरया’ला ‘अल्ला हो अकबर’चं प्रत्युत्तर असू शकतं. 1999 साली माझ्या बायकोसाठी अजित आगरकरने मला पास दिला. ती अर्ध्या मॅचनंतर उठून हॉटेलवर गेली; कारण तिला प्रेक्षकांच्या आक्रमकतेची भीती वाटली.
‘मँचेस्टर युनायटेड’ हा फुटबॉल क्लब ही आज मँचेस्टरची ओळख आहे. खरं तर क्लबपेक्षा ते फुटबॉलमधल्या एका धर्माचं नाव आहे. त्या धर्माची मंडळी अतिशय कर्मठ असतात. लहानपणी मँचेस्टर म्हटलं की, न पाहिलेल्या गिरण्या डोळय़ांसमोर उभ्या राहतात. आज मात्र इथे फक्त हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट मॅचची चर्चा आहे.
इंग्लंडमध्ये वारंवार सांगितला जाणारा एक किस्सा मला आठवतोय. मँचेस्टर हे लॅन्काशायर परगण्यातलं शहर. क्रिकेटमध्ये लॅन्काशायरचं हाडवैर यॉर्कशायरशी. एकदा यॉर्कशायरमन मॅच पाहत होता. त्याचा मित्र धावत धावत त्याच्याकडे आला आणि म्हणाला, ‘एक वाईट बातमी आहे. तुझी बायको शेजाऱयाबरोबर पळाली.’ तो यॉर्कशायरमन त्याला शांतपणे म्हणाला, ‘त्यापेक्षा वाईट बातमी सांगतो, जॅक हॉब्ज आऊट झालाय.’
हिंदुस्थान-पाकिस्तान मॅचच्या वेळी असाच एखादा इस्माईल मॅच पाहत असेल. त्याला एखादा हमीद येऊन सांगेल, ‘वाईट बातमी आहे, तुझ्या घराला आग लागलीए.’ इस्माईल त्याला उत्तर देईल, ‘त्यापेक्षा वाईट बातमी सांगतो. त्या जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजीला आग लावलीए आणि आग विझवायला बंब नाही.’ आकाशात सावळे ढग असतील (म्हणजे तशी आशा आहे). हिंदुस्थानने टॉस जिंकून पाकिस्तानला फलंदाजी दिली तर असं सहज घडू शकतं. पण टॉस हरला तर नको रे बाप्पा, शुभ बोल नाऱया!
हिंदुस्थान-पाकिस्तान संघाचं हाडवैर लॅन्काशायर-यॉर्कशायरपेक्षा जास्त कडवं आहे. लॅन्काशायर-यॉर्कशायर मॅचेसना ‘बॅटल ऑफ रोझेस’ म्हणत. त्या गुलाबांना काटे होते, पण गुलाबाचा सुगंध होता. अशा सामन्यांना तसं म्हणण्याची पद्धत आहे.
आजपर्यंत या वर्ल्डकपचा इतिहास पाहिला तर आपल्या वाटेला गुलाब आले. पाकिस्तानच्या वाटेला काटे. आजचा फॉर्मचा आणि संघाच्या ताकदीचा विचार केला तर पाकळय़ा पुन्हा आपल्या वाटेला यायला हरकत नाहीत. 2017 साली हिंदुस्थानी संघ इंग्लंडमध्येच चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध हरला; पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी संघाचा आलेख चढता राहिलाय. त्यानंतर हिंदुस्थानी संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर जेवढे सामने खेळला त्यातले 71 टक्के सामने जिंकले. पाकिस्तानची ही सरासरी फक्त 39 टक्के आहे.
हिंदुस्थानतर्फे त्यानंतर तब्बल 35 शतके ठोकली गेली. पाकिस्तानतर्फे फक्त 12.
हिंदुस्थानी फलंदाजी त्या पराभवानंतरची एकत्रित सरासरी 43.7 आहे. पाकिस्तानी 34.8 टक्के.
पाकिस्तानने षटकामागे 5.7 धावा दिल्या, आणि हिंदुस्थानने 5.25 टक्के.
आणि हिंदुस्थानने 81 टक्के झेल घेतले. पाकिस्तानने 71 टक्के.
म्हणजे प्रत्येक बाबतीत हिंदुस्थानी संघ वरचढ आहे.
थोडक्यात इतिहास बाजूने, सरासरी बाजूने पण आकाशात ढग असतील, (आणि तसं भाकीत आहे) तर टॉस आपल्या बाजूने राहायला हवा. पण दुर्दैवाने झाला नाही तर आघाडीला येणाऱया राहुल-रोहितवर जबाबदारी मोठी असेल. विराटला मोठी इनिंग खेळायला लागेल. मधल्या फळीत अनुभवाचा विचार करून कार्तिकच खेळेल असं वाटतं. ढग असले तर कुलदीपऐवजी शमीला घेण्यावाचून पर्याय नाही. पाकिस्तानचा ऍप्रोच ‘बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी’ असू शकतो. इंग्लंडला त्यांनी असाच धक्का दिला होता. पण हिंदुस्थानी संघ नक्की सावध असेल. पाकिस्तान ‘अब्दुल गनी’ व्हायची शक्यता जास्त आहे. आज उशीऐवजी डोक्याखाली बर्फ ठेवून हिंदुस्थानी संघाने झोपावं. जो मानसिक युद्ध जिंकेल तो जिंकेल.
या मॅचचा दबाव, आम्ही मीडियावाले विशेषतः टेलिव्हिजन मीडियावाले वाढवतात. याला धर्मयुद्धाचं, कश्मीरचं लेबल लावण्यात त्यांचा फायदा असतो. मला वाटतं, हिंदुस्थानी संघाने अशा कुठल्याही विचाराने न खेळता समोर एक संघ आहे, अंतिम सामन्याच्या रस्त्यावरचा अडथळा आहे, तो दूर करायलाच हवा या वृत्तीने खेळावं.
आणि आपण जर अट्टहासाने खेळाडूंच्या रंगीत कपडय़ांवर सैनिकाचे अदृश्य कपडे चढवणार असू, त्यांच्या बॅटला गन आणि बॉलला बॉम्ब समजणार असू, तर चुकून हरलोच तर त्यांना धारातीर्थी पडलेल्या सैनिकाला मिळणारी मानवंदना तरी द्या. त्यांचा आदर करा. आजपर्यंत तरी आपला इतिहास खेळाडूंच्या घरावर दगड फेकणे, त्यांचे पुतळे जाळणे, त्यांना सोशल मीडियावर लाखोली वाहणे हा आहे. आपण आपली मानसिकता बदलायला हवी.
घाला विराट कोहलीचे बूट आणि उतरा खेळायला. मग तुम्हाला त्याचं सुखदुःख, त्यांच्यावरचा दबाव कळेल.
वगैरेंची किंमत सोन्याच्या पाच ग्रॅमच्या नाण्याइतकी असू शकते. ब्रॉडकास्टर्स या मॅचसाठी जाहिरातीचे दर पन्नास टक्क्यांनी वाढवतात. इन्शुरन्स कंपन्या देवाला साकडे घालतायत. ओ जिजस, पाऊस थांबव. पावसाने त्यांना आधीच तीनशे कोटींच्या गाळात घातलंय. या सामन्याचा विमा नक्कीच मोठा असणार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रेक्षकांत फक्त निळाई दिसणार नाही, हिरवा रंगही डोळय़ांत भरेल. ‘गणपती बाप्पा मोरया’ला ‘अल्ला हो अकबर’चं प्रत्युत्तर असू शकतं. 1999 साली माझ्या बायकोसाठी अजित आगरकरने मला पास दिला. ती अर्ध्या मॅचनंतर उठून हॉटेलवर गेली; कारण तिला प्रेक्षकांच्या आक्रमकतेची भीती वाटली.
‘मँचेस्टर युनायटेड’ हा फुटबॉल क्लब ही आज मँचेस्टरची ओळख आहे. खरं तर क्लबपेक्षा ते फुटबॉलमधल्या एका धर्माचं नाव आहे. त्या धर्माची मंडळी अतिशय कर्मठ असतात.लहानपणी मँचेस्टर म्हटलं की, न पाहिलेल्या गिरण्या डोळय़ांसमोर उभ्या राहतात. आज मात्र इथे फक्त हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट मॅचची चर्चा आहे.
इंग्लंडमध्ये वारंवार सांगितला जाणारा एक किस्सा मला आठवतोय. मँचेस्टर हे लॅन्काशायर परगण्यातलं शहर. क्रिकेटमध्ये लॅन्काशायरचं हाडवैर यॉर्कशायरशी. एकदा यॉर्कशायरमन मॅच पाहत होता. त्याचा मित्र धावत धावत त्याच्याकडे आला आणि म्हणाला, ‘एक वाईट बातमी आहे. तुझी बायको शेजाऱयाबरोबर पळाली.’ तो यॉर्कशायरमन त्याला शांतपणे म्हणाला, ‘त्यापेक्षा वाईट बातमी सांगतो, जॅक हॉब्ज आऊट झालाय.’
हिंदुस्थान-पाकिस्तान मॅचच्या वेळी असाच एखादा इस्माईल मॅच पाहत असेल. त्याला एखादा हमीद येऊन सांगेल, ‘वाईट बातमी आहे, तुझ्या घराला आग लागलीए.’ इस्माईल त्याला उत्तर देईल, ‘त्यापेक्षा वाईट बातमी सांगतो. त्या जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजीला आग लावलीए आणि आग विझवायला बंब नाही.’ आकाशात सावळे ढग असतील (म्हणजे तशी आशा आहे). हिंदुस्थानने टॉस जिंकून पाकिस्तानला फलंदाजी दिली तर असं सहज घडू शकतं. पण टॉस हरला तर नको रे बाप्पा, शुभ बोल नाऱया!
हिंदुस्थान-पाकिस्तान संघाचं हाडवैर लॅन्काशायर-यॉर्कशायरपेक्षा जास्त कडवं आहे. लॅन्काशायर-यॉर्कशायर मॅचेसना ‘बॅटल ऑफ रोझेस’ म्हणत. त्या गुलाबांना काटे होते, पण गुलाबाचा सुगंध होता. अशा सामन्यांना तसं म्हणण्याची पद्धत आहे.
आजपर्यंत या वर्ल्डकपचा इतिहास पाहिला तर आपल्या वाटेला गुलाब आले. पाकिस्तानच्या वाटेला काटे. आजचा फॉर्मचा आणि संघाच्या ताकदीचा विचार केला तर पाकळय़ा पुन्हा आपल्या वाटेला यायला हरकत नाहीत. 2017 साली हिंदुस्थानी संघ इंग्लंडमध्येच चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध हरला; पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी संघाचा आलेख चढता राहिलाय. त्यानंतर हिंदुस्थानी संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर जेवढे सामने खेळला त्यातले 71 टक्के सामने जिंकले. पाकिस्तानची ही सरासरी फक्त 39 टक्के आहे.हिंदुस्थानतर्फे त्यानंतर तब्बल 35 शतके ठोकली गेली. पाकिस्तानतर्फे फक्त 12.हिंदुस्थानी फलंदाजी त्या पराभवानंतरची एकत्रित सरासरी 43.7 आहे. पाकिस्तानी 34.8 टक्के. पाकिस्तानने षटकामागे 5.7 धावा दिल्या, आणि हिंदुस्थानने 5.25 टक्के. आणि हिंदुस्थानने 81 टक्के झेल घेतले. पाकिस्तानने 71 टक्के.
म्हणजे प्रत्येक बाबतीत हिंदुस्थानी संघ वरचढ आहे.
थोडक्यात इतिहास बाजूने, सरासरी बाजूने पण आकाशात ढग असतील, (आणि तसं भाकीत आहे) तर टॉस आपल्या बाजूने राहायला हवा. पण दुर्दैवाने झाला नाही तर आघाडीला येणाऱया राहुल-रोहितवर जबाबदारी मोठी असेल. विराटला मोठी इनिंग खेळायला लागेल. मधल्या फळीत अनुभवाचा विचार करून कार्तिकच खेळेल असं वाटतं. ढग असले तर कुलदीपऐवजी शमीला घेण्यावाचून पर्याय नाही. पाकिस्तानचा ऍप्रोच ‘बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी’ असू शकतो. इंग्लंडला त्यांनी असाच धक्का दिला होता. पण हिंदुस्थानी संघ नक्की सावध असेल. पाकिस्तान ‘अब्दुल गनी’ व्हायची शक्यता जास्त आहे. आज उशीऐवजी डोक्याखाली बर्फ ठेवून हिंदुस्थानी संघाने झोपावं. जो मानसिक युद्ध जिंकेल तो जिंकेल.
या मॅचचा दबाव, आम्ही मीडियावाले विशेषतः टेलिव्हिजन मीडियावाले वाढवतात. याला धर्मयुद्धाचं, कश्मीरचं लेबल लावण्यात त्यांचा फायदा असतो. मला वाटतं, हिंदुस्थानी संघाने अशा कुठल्याही विचाराने न खेळता समोर एक संघ आहे, अंतिम सामन्याच्या रस्त्यावरचा अडथळा आहे, तो दूर करायलाच हवा या वृत्तीने खेळावं.
आणि आपण जर अट्टहासाने खेळाडूंच्या रंगीत कपडय़ांवर सैनिकाचे अदृश्य कपडे चढवणार असू, त्यांच्या बॅटला गन आणि बॉलला बॉम्ब समजणार असू, तर चुकून हरलोच तर त्यांना धारातीर्थी पडलेल्या सैनिकाला मिळणारी मानवंदना तरी द्या. त्यांचा आदर करा. आजपर्यंत तरी आपला इतिहास खेळाडूंच्या घरावर दगड फेकणे, त्यांचे पुतळे जाळणे, त्यांना सोशल मीडियावर लाखोली वाहणे हा आहे. आपण आपली मानसिकता बदलायला हवी. घाला विराट कोहलीचे बूट आणि उतरा खेळायला. मग तुम्हाला त्याचं सुखदुःख, त्यांच्यावरचा दबाव कळेल.

























































