वेधक- गरजू विद्यार्थ्यांना फूड स्कॉलरशिप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रज्ञा साबळे 

शिक्षणासाठी गावावरून शहरात (विशेषत पुण्यात) आलेल्या तसेच अनाथ, सिंगल पेरेन्ट्स आणि आर्थिक परिस्थिती नसलेल्या गरजू विद्यार्थ्यांना महाविद्यालयीनफूड स्कॉलरशिपउपामामुळे मोठा आधार मिळणार आहे. ‘स्टुडंट हेल्पिंग हँडया संस्थेमार्फत या गरजू विद्यार्थ्यांना दोन वेळचे मोफत जेवण पुरविण्यात येत आहे

या सामाजिक उपामाची सुरुवात फूड स्कॉलरशीपचे संस्थापक कुलदीप आंबेकर यांनी 2018 मध्ये केली. स्वत मराठवाडा  धाराशिव येथून असलेल्या कुलदीप आंबेकर यांना पुण्यात आल्यानंतर जेवणासाठी अडचणी येत गेल्या तेव्हा त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य कळत गेले आणि त्यावेळी त्यांना फूड स्कॉलरशिप ही कल्पना सुचली. त्यामुळे ग्रामीण भागातून आणि विशेषत मराठवाडा, विदर्भातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱया गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दोनवेळच्या जेवणाचा आधार देणे हे या उपामाचे उद्दिष्ट ठरले.

अनेक विद्यार्थी केवळ पैशांअभावी एकवेळ जेवून किंवा उपाशीपोटी अभ्यास करतात. यातून विद्यार्थ्यांमध्ये कुपोषण आणि अशक्तपणा (अॅनिमिया) सारख्या समस्या उद्भवतात, अशा वेळी ही मदत अत्यंत मोलाची ठरत आहे. दरवर्षी 500 विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत आतापर्यंत 3 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या अन्न शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. या शिष्यवृत्तीत विद्यार्थ्यांना 2 वेळेला म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी डबा दिला जातो. ही मदत 1 वर्ष केली जाते.

डबा घरपोच न देता केंद्रावरून दिला जातो. एकूण 8 केंद्र असून या केंद्रात स. प. महाविद्यालय, फर्ग्युसन, मराठवाडा मित्र मंडळ, बीएमसीसी, वाडिया आणि हडपसरचा काही भाग यांचा समावेश आहे. भविष्यात लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा विचार ‘फूड स्कॉलरशीप‘ करत असून दरवर्षी 1 हजार मुलांना लाभ मिळावा असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरिकांना देखील या उपामात आर्थिक किंवा स्वयंसेवक म्हणून सहभागी होता येईल. त्यासाठी नागरिकांनी दात्याची भूमिका निभवावी असे आवाहन संस्थेतर्फे

करण्यात आले आहे. या सेवेचा लाभ इच्छुकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम या पेजवर किंवा वेबसाईटवर घ्यावा असे आवाहन एस. पी. महाविद्यालयाचा प्रतिनिधी महेश जाधव याने केले आहे.