ट्रेंड – गाडीबरोबर शरीराचीही सर्व्हिसिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेयर झाला आहे. जिथे एक नवीन सेवा ग्राहकांसाठी सुरू झाली आहे. एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी ग्राहकाला त्यांची गाडी आणि स्वतःला धुवून घेण्याची संधी मिळाली आहे. या अनपेक्षित सेवेमुळे प्रेक्षकांची चांगलीच करमणूक झाली. अनेकांनी गंमतीने म्हटले की, ही कल्पना एक परिपूर्ण ‘वन-स्टॉप वॉश’ असू शकते, तर काहींना उत्सुकता होती की असा व्यवसाय प्रत्यक्षात कसा चालेल आणि ग्राहक या सोयीसाठी खरोखर पैसे देतील का? हा व्हिडिओ @tv1indialive या इन्स्टा अकाऊंटवरून शेयर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.