Photo – रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त शिवसेना व शैक्षणिक संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेकडून चिल्ड्रन होममधील मुलांना, तर ‘प्रबोधन कुर्ला’ शाळेतर्फे पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. तसेच नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ फोडाफोडीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिवसेना-युवासेना वरळी विधानसभा व वरळी सागरी कोळी महोत्सव समितीच्या वतीने नारळ फोडाफोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील व विभाग अधिकारी आकर्षिका पाटील यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला आमदार सुनील शिंदे, बाळा खोपडे, शाखाप्रमुख जिवबा केसरकर, महिला शाखा संघटक अनिता नायर, कार्यकारिणी सदस्य अश्विनी पवार, योगिनी सावंत, गायत्री शिरोडकर, स्नेहल देशमुख, समृद्धी कोयंडे, अक्षय मोरे, समन्वयक शैलेश सिंग, श्रुतिका कदम उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्रमांक ७ व ‘आम्ही दहिसरकर प्रतिष्ठान’तर्फे नारळ फोडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विलास ठाकूर व छाया कांबळे हे विजेते ठरले. या वेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, बाळकृष्ण दामले, प्रयेश पाटील, किशोर म्हात्रे, सौरभ घोसाळकर, पूजा घोसाळकर, अजित मांजरेकर, अनुष्का मांजरेकर, शर्मिला पाटील, अनघा परळकर, मालती पाटील, राहुल गावंड, रमेश ठाकूर, कुंदन वर्तक, सागर नार्वेकर, अविनाश भोईर, संकेत कदम, नयन कदम, जितेंद्र श्रीधनकार, सचिन गुंजाळ आदी उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चेंबूरच्या चिल्ड्रन होममधील मुलांसोबत रक्षाबंधनांचा सण साजरा करण्यात आला. १७१ मानखुर्द-छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभेच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विभागप्रमुख सुरेश पाटील व विभाग संघटक प्रज्ञा सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी विधानसभा प्रमुख संजय चव्हाण, उपविभागप्रमुख तात्या सारंग, गणेश नायडू, हेमंत साळवी, एकनाथ खराडे, शारदा पालकर, श्रद्धा मोहिले, किरण गवंड, इब्राहिम पटेल, गणेश वाव्हळ, मेइमुना, सुभाष चौगुले, सोमनाथ पाखरे, सुनील येवले, गुफरान अन्सारी, अजय गायकवाड, हर्षल उस्तुरे, रोहन गेजगे, शिवाजी झोरे, वनिता बोर्गे, पूनम जाधव, अपर्णा यादव आदी उपस्थित होते.

सणासुदीच्या काळात कर्तव्यावर तत्पर असणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘प्रबोधन कुर्ला’ शाळेच्या वतीने रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कुर्ला पोलीस ठाण्यात हा सोहळा उत्साहात पार पडला. शिवसेना उपनेते व शाळेचे अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगावकर, विश्वस्त शलाका कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विशाखा परब, माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष चिकणे यांच्यासह शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास राठोड यांनी, “शाळाच खऱ्या अर्थाने विवेकशील आणि संस्कारक्षम समाज घडवत असते,” असे मत व्यक्त केले.