
मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, फुगडी, झिम्मा, उखाणे स्पर्धा व लेझीम अशा मोठय़ा थाटामाटात लालबागमधील नप्पू हॉल येथे मंगळागौरीचा उत्सव रंगला. शिवसेना भायखळा विधानसभा आणि प्रवाह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात भायखळा परिसरातील दोनशेहून अधिक सुवासिनींनी पारंपरिक वेशात कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
भायखळा विधानसभेच्या उपविभाग संघटक व नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्या विशेष पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते आणि भायखळा विधानसभेचे आमदार मनोज जामसुतकर उपस्थित होते. कार्यक्रमास नगरसेवक रमाकांत रहाटे, सुरेखा राऊत, चंदना साळुंके, सहसंघटक, उषा पाटोळे, शिल्पा जाधव, शाखा संघटक प्रियांका टेमकर, अंजना औटी, संगीता कोरे, संध्या तळेकर, शीतल थोरात, सोनल सायगावकर, मनीषा जांबरे, शिल्पा म्हात्रे, ऋता कोळी, विद्या राबडिया, माधुरी पोखरकर, हर्षदा वत्से उपस्थित होते. सहसंघटक हेमंत कदम व शाखा समन्वयक स्वप्नील बागवे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेतले.





























































